गौरवान्वीत जीवनाचे असामान्यातील सामान्य व्यक्तिमत्व म्हणजे प्रा. डॉ.डी.एम.ललवाणी : अॅड.डॉ.क्रांती महाजन
भुसावळ (8 जानेवारी 2026) : शहरातील कोटेचा महिला महाविद्यालयाचे माजी प्रभारी प्राचार्य व ललवाणी फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा.डॉ.डी.एम.ललवाणी यांना नुकताच आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त संस्था वंडर सेवन तर्फे जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. याप्रसंगी एडवोकेट डॉक्टर क्रांती महाजन यांनी नमूद केले की, आपल्या जीवनातील अत्यंत संघर्षशील व्यक्तिमत्व, सदैव कार्यरत असणारे, तसेच जरी ते असामान्य असले तरी स्वतःला सामान्य आणि साधारण समजणारे, कोणत्याही प्रकारचा अभिनिवेश न राखणारे, एकदा शब्द दिला तर कायम पाळणारे, अहोरात्र मेहनत घेऊन कोणत्याही कार्यात झोकून देणारे व्यक्तिमत्व म्हणजे प्रा.डाँ.डि.एम.ललवाणी.
अत्यंत गरीबीच्या परिस्थितीतून संघर्ष करून तसेच प्रामाणिकपणा, निष्ठा राखून त्यांनी आपली सेवा समर्पित केली. सेवा समाप्तीनंतर सुद्धा त्यांना फार मोठ्या धक्क्यातून जावं लागलं. जो धक्का असह्य होता. परंतु त्यांनी त्या धक्क्यातून सुद्धा पुन्हा उभारी घेऊन फिनिक्स पक्षाप्रमाणे आपलं नवीन विश्व उभारणी केली. एक शेतकरी, एक गोसेवक, एक उद्योजक, अशा विविध भूमिका पार पाडून त्यांनी एका छोट्याशा गावात जंगलातून नंदनवन निर्माण केले असून आपली दिनचर्या त्यांनी निसर्ग, प्राणी, पक्षी अशा निस्वार्थ भावनेत समर्पित केली आहे .कोणताही बडेजाव नाही. साधी राहणे व सदैव कार्य तप्तर कार्यक्षम व रिटायर्ड झाले तरी टायर्ड न होता रिस्टंडअप व्यक्तिमत्व म्हणजेच प्रा डॉ.डि.एम.ललवाणी. भारतातून विविध क्षेत्रातून, विविध प्रांतातून व विविध व्यक्तिमत्व असलेल्या हजारो च्या संख्येने उपस्थित असलेल्या भावनात्मक वातावरणात जीवन गौरव पुरस्काराने गौरवण्यात आले .या दैदिप्यमान कार्यक्रमात हा पुरस्कार एकमेव व्यक्तीला देण्यात आला.


नागपूरच्या विदर्भ हिंदी साहित्य संमेलनाच्या सांस्कृतिक सभागृहात,
23 व्या अखिल भारतीय प्रतिभा महासंमेलनाचा उत्सव …
दोन दिवसांच्या भव्य आयोजनात, पुरस्कार सोहळा झाला ज्ञानाचा, साहित्याचा आणि क्रीडेचा महोत्सव.
श्रीमंत मुधोजीराजे भोसले, नागपूरच्या भोसले राजघराण्याचे वारसदार,
डॉक्टरेट धारी,सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रातील सक्रिय योद्धे,
भोसले वंशाच्या गौरवशाली इतिहासाचे संवर्धक, जनजागृतीचे ध्वजवाहक, त्यांच्या शुभ हस्ते झाला जिवन गौरव पुरस्कार.
ऐतिहासिक वारसा जागवणारे. सुभेदार कुणाल मालुसरे, छत्रपती शिवरायांच्या शूर सेनानी योद्धा तानाजींचे मालुसरे यांचे वंशज,
प्रखर देशभक्त, गड-किल्ले संवर्धनाचे कार्यकर्ते, पुण्याचे गर्व,
त्यांच्या करस्पर्शाने पुरस्कार झाला प्रेरणा देणारा,…
दोन महानीयांच्या उपस्थितीत सोहळा झाला अविस्मरणीय…
मुख्य आयोजक डॉ. क्रांती महाजन यांच्या नेतृत्वात, सेवानिवृत्त प्रा. डॉ. पंढरीनाथ रोकडे, वाराणसीच्या अग्रसेन युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर तथा 2025 च्या भारत सुंदरी श्रीमती रुपाली वशिष्ठ, हिंदुस्तान स्काऊट गाईडचे राष्ट्रीय संचालक, तेजस्वी व्यक्ती. सहकार भारती व हिंदुस्थान स्काउट गाईड चे राष्ट्रीय संचालक डाँ.राकेशकुमार मिश्रा (रायपूर), उत्तरप्रदेशचे सांस्क्रुतीक मंत्री यशवंत निकोसे,डाँ.प्रदिप टंडन ( उत्तर प्रदेशचे वैद्यकीय अधिकारी,) राजाभाऊ उंबरकर , अमरावतीचे उद्योजक-सामाजिक कार्यकर्ते,दयाराम राँय,पंचायतराज अभियानाचे राष्ट्रीय प्रवर्तक(ऊत्तरप्रदेश)साहित्यकार टि.बी.चंद्रसुब्बा(सिक्कीम)युधिष्टीर राणा,(पंजाबी कलाकार)ि शवयोगी स्वामी क्रुष्णकांत महाराज
आणि इतर अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात, प्रतिभा महासंमेलन झाले.
बत्तीस वर्षांच्या माझ्या शैक्षणिक सेवेच्या मेहनतीचे फळ,माझ्या सामाजीक कार्याची पावती, माझ्यासंघर्षाच्या जिवनाची सफलता म्हणजे जिवन गौरव सोहळा , महानीयांच्या हस्ते झालेला हा मान, अभिमानास्पद, ज्ञानप्रकाशाचा दीप उजळला, साहित्य-कला-समाजसेवा-चा संगम झाला अद्भुत. नागपूरच्या या भव्य संमेलनात प्रतिभेचा महासागर लहरला, भोसले-मालुसरे यांच्या उपस्थितीत इतिहास जागला, प्रतिभावंतांच्या साक्षीत सोहळा झाला. वर्ल्ड सेव्हन वंन्डर्स रेडियंट टॅलेंट बुक आँफ रेकार्ड चे प्रमुख तथा संमेलनाचे आयोजक डॉ.क्रांती महाजन सर आणि सर्व आयोजक टीम यांचे प्रा.डॉ.डी.एम.ललवाणी यांनी अत्यंत भावस्पर्शी शब्दात आभार व्यक्त करुन पुरस्कार प्रेरणा देतात असे नमुद केले.







