श्रमातून घडते संस्कारक्षम पिढी : प्राचार्य आर.पी.फालक
A disciplined generation is shaped through hard work: Principal R.P. Falak भुसावळ (9 जानेवारी 2026) : भुसावळ येथील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष हिवाळी शिबिर राजोरे, ता.यावल येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये दिनांक 7 ते 13 दरम्यान सुरू आहे. शिबिर उद्घाटन प्रसंगी अध्यक्षस्थानी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्राचार्य परिषदेचे उपाध्यक्षपदी असलेले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. पी. फालक होते. उद्घाटक राजोरे ग्रामपंचायतच्या सरपंच पुष्पा पाटील होत्या.
सुविधा पुरवण्याचे आश्वासन
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र पाटील यांनी विद्यार्थ्यांना शाळेच्या माध्यमातून सुविधा पुरवण्याचे आश्वासन देत असतानाच परिसर स्वच्छता आणि सुशोभीकरणासाठी काय करता येईल याचे चिंतन करावे, तसेच प्राथमिक शाळेचे विद्यार्थी संस्कारक्षम असतात म्हणून विद्यार्थ्यांनी त्यांच्या वागणुकीतून लहान मुलांसमोर अनुकरणाद्वारे संस्कार करावेत, असे आवाहन केले. व


शिबिरातील शिस्त आयुष्य घडवताना मार्गदर्शक
प्राचार्य डॉ.आर.पी.फालक यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, शिबिरांमध्ये लागलेली शिस्त ही विद्यार्थ्यांचा आयुष्य घडवताना सतत मार्गदर्शक ठरत असते आपण असे काम करावे जे कायम स्मरणात राहील आणि समाजाच्या उपयोगाचे असेल. देशाची, समाजाची आणि आईवडिलांची सेवा केल्याने केवळ सेवेचे समाधान होत नाही तर त्याच्या संस्कारातून जगण्याची नवी दिशा ही मिळते म्हणून ’ माझ्यासाठी नाही तुझ्यासाठी’ हे राष्ट्रीय सेवावयोजनेचे ब्रीदवाक्य नेहमी स्मरणात ठेवावी.
यांची होती उपस्थिती
राजोरे गावच्या पोलिस पाटील मुक्ता गोसावी, ग्रामपंचायत सदस्य चेतन पाटील, सुवर्णा महाजन, रोहिणी बोरोले, सुनंदा पाटील, शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र पाटील, उपशिक्षिका वैशाली पाटील व गावातील मान्यवर उपस्थित होते.
शिबिराच्या उद्घाटन सत्राचे प्रास्ताविक मयूर महाजन यांनी केले व पुढील सात दिवसांमध्ये शिबिरामध्ये होणार्या विविध उपक्रमांची माहिती ग्रामस्थ व विद्यार्थ्यांसमोर मांडण्यात आली.
या प्रसंगी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना एकाकाचे माजी स्वयंसेवक आणि सध्या जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेले राजेंद्र कोल्हे यांचा पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.फालक यांच्या हस्ते विशेष सन्मान व गौरव करण्यात आला. उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन माजी कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.दयाघन राणे यांनी केले.
यशस्वीतेसाठी यांचे परिश्रम
शिबिर यशस्वीतेसाठी कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.जे बी चव्हाण , सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.अनिल सावळे, सहायक महिला कार्यक्रम अधिकारी प्रा.श्रेया चौधरी आणि शिक्षकेतर कर्मचारी प्रकाश चौधरी यांनी सहकार्य केले.







