भुसावळातील एमओएच कारखान्यात हूक तुटल्याने तंत्रज्ञ गंभीर जखमी

रेल्वे इंजिनची देखभाल दुरुस्ती करताना दुर्घटना : रेल्वे हॉस्पिटलमध्ये उपचार


A technician was seriously injured at the MOH factory in Bhusawal when a hook broke. भुसावळ (9 जानेवारी 2026) : शहरातील मध्य रेल्वेच्या रेल्वे इंजिन देखभाल दुरुस्ती (एमओएच) कारखान्यात गुरुवारी सकाळी 9 वाजेच्या लोको हुडचा हूक तुटल्याने दुर्घटनेत तंत्रज्ञ जखमी झाला. जखमी कर्मचार्‍यावर रेल्वे रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती सध्या स्थिर आहे.

असा घडला अपघात ?
एमओएच कारखान्यात टेक्निशियन म्हणून कार्यरत असलेले लोकेश लिलाधर पाटील ( 40) हे नेहमीप्रमाणे इंजिनच्या लोको हुडच्या देखभाल दुरुस्तीचे काम करत होते. यावेळी लोको हुडला लावलेला हूक अचानक तुटून संतुलन बिघडले. तुटलेला लोखंडी भाग पाटील यांच्या डाव्या बाजूच्या मानेवर आदळला. यामुळे ते गंभीर जखमी झाले. हा प्रकार नजरेस येताच सहकार्‍यांनी त्यांना रेल्वे रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती स्थिर आहे. घटनेची माहिती मिळताच विविध कर्मचारी संघटना पदाधिकार्‍यांनी रेल्वे हॉस्पिटल गाठले.

सध्या हिवाळ्याचे दिवस आहेत. थंडीमुळे लोखंड आकुंचन पावते. अवजारांना तडे जाण्याची शक्यता वाढते. याच कारणामुळे संबंधित हुकला तडा जाऊन अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज कर्मचार्‍यांनी व्यक्त केला. मात्र, चौकशीतून खरे कारण समोर येईल असे अधिकार्‍यांनी स्पष्ट केले.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !