दिगंबर जैन मुनींचे भुसावळ नगरीत उद्या आगमन
वीस दिगंबर जैन संत एवं आर्यिका यांचे शहरात आगमन
The Digambar Jain monks will arrive in Bhusawal city tomorrow भुसावळ (9 जानेवारी 2026) : भारत गौरव, दिगंबर जैन मुनि, प.पू.सारस्वताचार्य 108 श्री विभवसागरजी महाराज तसेच समस्त मुनी संघ एवं आर्यिका संघ (20 पिच्छी) यांचे भुसावळ नगरीत शनिवार, 10 रोजी सकाळी आठ वाजता आगमन होणार आहे. सर्व शहरवासीयांनी तसेच समाज बांधवांनी उपस्थिती देवून महाराजांच्या आगमनाचा धर्म लाभ घ्यावा, असे आवाहन सकल जैन समाज भुसावळतर्फे करण्यात आले आहे.
उद्या शहरात होणार आगमन
शनिावार, 10 जानेवारी रोजी सकाळी सावदा येथून पूर्ण संघ पायी विहार करून सकाळी आठ वाजता भुसावळ शहरात दाखल होईल.
गांधी पुतळा, महाराणा प्रताप चौक, लोखंडी पूल, मरी माता मंदिरमार्गे, आठवडे बाजार येथील दिगंबर जैन मंदिर येथे मुनी संघ विराजमान होतील. दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन सकल जैन समाज भुसावळतर्फे करण्यात आले आहे.


