भुसावळातील बियाणी मिलिटरी स्कूलमध्ये मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात
भुसावळ (10 जानेवारी 2026) : शहरातील बियाणी मिलिटरी स्कूलमध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. संस्थाध्यक्ष मनोज बियाणी, सचिव डॉ.संगीता बियाणी, पियुष बियाणी यांच्याहस्ते हिरवा झेंडा दाखवून स्पर्धेला सुरुवात झाली. भुसावळ वाहतूक शाखेचे कर्मचारी संजय भदाणे, अजय पाटील, स्मिता अहिरे, बाजारपेठ पोलीस स्टेशनचे भाऊसाहेब पाटील, हेमंत जंगले यांनी बंदोबस्त व वाहतूक सुरक्षेसाठी सहकार्य केले.
विविध गटात स्पर्धा
या मॅरेथॉन स्पर्धेत पहिली व दुसरी प्रथम गट, तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्याचा द्वितीय गट, पाचवी ते सहावी तृतीय गट, सातवी व आठवी विद्यार्थ्याचा चतुर्थ गट व नववी ते बारावी विद्यार्थ्यांचा पाचवा गट तसेच वयोगटा प्रमाणे मुलींचे विविध गट तयार करण्यात आले. शाळेच्या एकूण 1200 विद्यार्थी व विद्यार्थिनींनी या स्पर्धेत सहभाग घेतला.

विजयी स्पर्धक असे
लहान गट (प्रथम गट)- मुली : प्रथम- मानवी धनगर, द्वितीय- स्नेहल बारेला, तृतीय- आरोही तडवी
प्रथम गट (मुले) : साई प्रवीण कचरे, द्वितीय- कल्पेश पाटील, तृतीय- कुणाल आवार.
दुसरा गट (मुली): प्रथम- निशा बारेला द्वितीय- योगेश्री पावरा, तृतीय-रवीना पावरा
मुलांमध्ये प्रथम- पियुष धनगर, द्वितीय- दुर्गेश दागोडे, तृतीय- हर्ष कणखरे
तिसरा गट (मुली)- प्रथम- जानवी गावीत, द्वितीय- आरोही गावीत, तृतीय- मनस्वी वसावे
तिसरा गट (मुले)- प्रथम- कृष्णा धनगर, द्वितीय- सोहम रंजीत भोळे,
तृतीय- साईश सतीश मांगले
चौथा गट (12 वर्षा खालील) मुली : प्रथम- ज्ञानेश्वरी पाटील, द्वितीय- वैष्णवी कमलाकर धनगर, तृतीय- दिव्यानी पाटील
चौथा गट (बारा वर्षाखालील) मुले : प्रथम- रुद्र राठोड, द्वितीय- ओम बोरसे, तृतीय- खुशाल सावळे
पाचवा गट (14 वर्षाखालील) मुली प्रथम- दिव्या बारेला, द्वितीय लक्ष्मी बारेला, तृतीय- अश्विनी बारेला
पाचवा गट ( 14 वर्षाखालील) मुले प्रथम- चिंतामण हाके, द्वितीय- नचिकेत बोंडक, तृतीय प्रथमेश गोपाल परदेशी
सहावा गट (16 वर्षाखालील) मुले- प्रथम- योगेश कोलेकर, द्वितीय दानिश तडवी, तृतीय सविन बारेला
स्पर्धेत प्रथम,द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकवणार्या धावपटुचा मान्यवरांच्या हस्ते पदक व बक्षिसे देवून गौरव करण्यात आला. यात मोठा गट हा आठ किलोमीटर पर्यंत धावला तर छोटा गट पाच किलो मीटर पर्यंत धावला.
यशस्वीतेसाठी यांचे परिश्रम
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी शाळेचे प्राचार्य डी.एम.पाटील, पर्यवेक्षक रवींद्र तायडे, निवृत्ती पाटील, क्रीडा शिक्षक एच.एन.पाटील, दिलीप संगेले, युसूफ खान, तुषार सैतवाल, सैनिकी प्रशिक्षक सुधीर पाटील, समाधान सूर्यवंशी तसेच शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.

