भुसावळातील श्री.र.न.मेहता विद्यामंदिरात स्नेहसंमेलन
भुसावळ (11 जानेवारी 2026) : शहरातील श्री.र.न.मेहता हिंदी प्राथमिक विद्यामंदिरात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. प्रमुख पाहुणे म्हणून हिंदी सेवा मंडळाच्या सचिव मधुलता शर्मा उपस्थित होत्या.
विद्यार्थ्यांनी विविध गाण्यांवर नृत्य केले. त्यासोबत विद्यार्थ्यांनी एकांकिका, गायन, नाटक सादर केले. विद्यार्थ्यांनी नृत्यातून विविध सामाजिक संदेश दिले. विद्यार्थ्यांचे सादरीकरण अतिशय उत्कृष्ट असल्याचे प्रतिपादन मधुलता शर्मा यांनी केले. संस्थेचा अमृत महोत्सव यावर्षी साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त नाविन्यपूर्ण तसेच विद्यार्थीहितार्थ उपक्रम विद्यालयातर्फे राबविण्यात येत असल्याचे प्रतिपादन प्रधानाध्यापिका रिता शर्मा यांनी केले. वैशाली चौधरी सूत्रसंचालन केले. शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत विद्यार्थ्यांनी घेतली.


