भुसावळातील कोटेचा महिला महाविद्यालयाचे रासेयो शिबिर उत्साहात
साकेगाव परिसराची स्वच्छता
या शिबिरात विशेष कार्यक्रम अंतर्गत चैतन्य आयुर्वेदिक महाविद्यालय परिसर स्वच्छता, साकेगाव मध्ये जाऊन स्वच्छता तसेच समाज प्रबोधन रॅली, वनराई बंधारा बांधण्यात आला त्या शिवाय चैतन्य आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.माणिक पाटील व त्यांच्या टीमच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर घेण्यात आले. शिबिरात वृक्षारोपण व पे बँक टू सोसायटी अंतर्गत विद्यार्थिनींनी घरून आणलेले धान्य गावातील गरीब परिवाराला वाटप करण्यात आले.

यांनी केले मार्गदर्शन
शिबिरात प्रा.डॉ.अनिल बारी, उमेश पाटील, प्रा.मयूर महाजन, दिलीप भारंबे, प्रा.डॉ.पंकज नन्नवरे, विजय कोळी, गौतम निकम, नरेंद्र महाले, प्रा.डॉ.दयानंद राणे, डॉ.माणिक पाटील, दीपी अनफाट, पी.एम.पाटील, प्रा.डॉ.रुपेश मोरे, आकांक्षा धांडे यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
यांची होती उपस्थिती
शिबिराच्या समारोपप्रसंगी अध्यक्ष व प्रभारी प्राचार्य डॉ.जे.एस.धांडे, पूर्व खानदेश श्वेत कुष्ठ मंडळाच्या संचालिका डॉ.अरुणा चौधरी, प्राचार्य डॉ.माणिक पाटील, डॉ.रुपेश मोरे (बोदवड), माधुरी मोरे, आकांक्षा धांडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविकात डॉ. मीना चौधरी यांनी शिबिराचा पूर्ण अहवाल सादर केला व सहकार्याबद्दल सर्वांचे आभार मानले. डॉ.जीवन धांडे यांनी विद्यार्थिनींना एनएसएस कॅम्पचे महत्त्व नमूद केले व डॉ.अरुणा चौधरी यांनी आपल्या मार्गदर्शनप्रद भाषणात र्विद्यार्थिनींना संघटन व श्रम संस्कारचे महत्व समजावून सांगितले. आभार प्रा.संदीप नेतनराव व सूत्रसंचालन प्रा.निलेश गुरुचळ यांनी केले. यशस्वीतेसाठी प्रा.उज्वला महाजन, प्रा.भावना शंखपाल, प्रा.धनश्री सोनवणे, प्रा.विनोद भालेराव, प्रा.गिरीश सरोदे तसेच शिक्षकेतर कर्मचारी शिवदास बाऊस्कर यांचे सहकार्य लाभले.

