रेल्वे सुरक्षा आयुक्तांचा भुसावळ विभागाचा निरीक्षण दौरा : सुरक्षा, परिचालन व्यवस्थेची सखोल तपासणी
Railway Safety Commissioner’s inspection tour of the Bhusawal division: Thorough inspection of safety and operational systems भुसावळ (11 जानेवारी 2026) : रेल्वे सुरक्षा आयुक्त (सेंट्रल सर्कल) मनोज अरोरा यांनी मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाचा सविस्तर निरीक्षण दौरा केला. या भेटीत त्यांनी विभागातील विविध सुरक्षा व परिचालनाशी संबंधित यंत्रणा, सुविधा आणि कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला. रेल्वे सुरक्षा आयुक्त अरोरा यांनी या दौर्यात आरओएच डेपो, न्यू ओआरएच तसेच फिल्टर प्लांटची तपासणी करण्यात आली.
या ठिकाणी सुरक्षा मानके, देखभाल व्यवस्था व कार्यपद्धतींची सखोल पाहणी करत त्यांनी संबंधित अधिकार्यांना आवश्यक सूचना व मार्गदर्शन दिले. रेल्वे प्रवाशांची व माल वाहतुकीची सुरक्षितता अधिक भक्कम करण्याच्या दृष्टीने सर्व यंत्रणांनी काटेकोरपणे नियम पाळावेत, यावर भर देण्यात आला.

यानंतर विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयात विभागातील सर्व शाखा अधिकार्यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीत भुसावळ विभागातील एकूण सुरक्षा व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेतला. रेल्वे परिचालन अधिक सुरक्षित, जलद व कार्यक्षम करण्यासाठी विविध मुद्द्यांवर चर्चा करत सुधारात्मक उपाययोजनांवर विचारमंथन करण्यात आले. यावेळी डीआरएम पुनीत अग्रवाल, अपर मंडल रेल्वे व्यवस्थापक (तांत्रिक) एम.के.मीना यांच्यासह विभागातील सर्व वरिष्ठ शाखा अधिकारी उपस्थित होते.

