भुसावळात दोडे गुर्जर समाजातर्फे स्नेहसंमेलन उत्साहात


A get-together was organized with great enthusiasm by the Dode Gurjar community in Bhusawal भुसावळ (12 जानेवारी 2026) : भुसावळ शहरातील दोडे गुर्जर समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक स्नेह संमेलनास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्नेह संमेलनाला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे स्वीय सहाय्यक नवलसिंग पाटील तसेच भुसावळच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांची उपस्थिती होती.

प्रसंगी समाजातील ज्येष्ठ नागरिकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान दोडे गुर्जर समाजातील विविध समस्या, अडचणी व अपेक्षा मान्यवरांनी जाणून घेतल्या. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन देत उपस्थित समाजबांधवांचे मान्यवरांनी आभार मानले.

स्नेह संमेलनामुळे समाजात एकोपा, आपुलकी व सामाजिक बांधिलकीची भावना अधिक दृढ झाल्याचे चित्र दिसून आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समाजाच्या पदाधिकार्‍यांसह युवक व महिला भगिनींनी विशेष परिश्रम घेतले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !