भुसावळातील दे.ना.भोळे महाविद्यालयात स्वामी विवेकानंद जयंती व राष्ट्रीय युवा दिन साजरा


Swami Vivekananda Jayanti and National Youth Day were celebrated at D.N. Bhole College in Bhusawal भुसावळ (12 जानेवारी 2025) : शहरातील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात सोमवार, 12 जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्राचार्य महासंघाचे उपाध्यक्ष डॉ.राजू फालक यांच्याहस्ते स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस माल्यपर्ण करण्यात आले.

ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका
प्राचार्य डॉ राजू फालक म्हणाले की, हा दिवस भारत सरकारने राष्ट्रीय युवा दिन म्हणून घोषित केला आहे कारण स्वामी विवेकानंद हे भारतीय तरुणांसाठी प्रेरणास्त्रोत होते. स्वामी विवेकानंद म्हणतात उठा, जागे व्हा आणि ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका. हा संदेश आजच्या तरुणांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. तरुणांनी सर्वप्रथम स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे. आत्मविश्वासाशिवाय यश शक्य नाही. स्वतःचे स्पष्ट ध्येय ठरवा आणि त्या दिशेने सातत्याने प्रयत्न करा. स्वामी विवेकानंदांनी शिक्षणाला जीवन परिवर्तनाचे साधन मानले. केवळ पदवी मिळवणे नव्हे तर चारित्र्य घडवणारे शिक्षण हे खरे शिक्षण आहे. ज्ञानाबरोबरच विवेक, मूल्ये आणि शिस्त आवश्यक आहे. मजबूत शरीरातच मजबूत मन वसते असे ते सांगत. तरुणांनी व्यायाम, योग, खेळ याकडे लक्ष द्यावे. तणावमुक्त व सकारात्मक विचारसरणी अंगीकारावी. समाजातील गरिबी, अज्ञान, अन्याय याविरुद्ध उभे राहून देशासाठी कार्य करणे हे तरुणांचे कर्तव्य आहे. प्रामाणिकपणा, सचोटी, मेहनत व करुणा हे गुण अंगीकारले तरच यशाला खरी किंमत मिळते. चारित्र्यवान तरुणच सशक्त राष्ट्र घडवू शकतो. आजच्या जागतिक स्पर्धेच्या युगात स्वामी विवेकानंदांचे विचार तरुणांसाठी दीपस्तंभ आहेत. त्यांच्या विचारांवर चालत आत्मविश्वास, कष्ट, ज्ञान व देशप्रेम या मूल्यांवर आधारित जीवन घडवूया.

यांची होती उपस्थिती
यावेळी विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डॉ.संजय चौधरी, प्रा.एस.डी.चौधरी, प्रा.डॉ.अंजली पाटील, प्रा.डॉ.आर.बी.ढाके, प्रा.डॉ.जी.पी.वाघुळदे, प्रा.डॉ.आर.डी.भोळे, प्रा.डॉ.जयश्री सरोदे, प्रा.संगीता धर्माधिकारी, प्रा.डॉ.माधुरी पाटील, प्रा.एस.एस.पाटील, प्रा.खिलचंद धांडे, प्रकाश सावळे उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !