भुसावळातील जिजामाता प्राथमिक विद्यामंदिरात सांस्कृतिक कार्यक्रमात कलागुणांचे सादरीकरण
Students showcased their talents in a cultural program at Jijamata Primary School in Bhusawal भुसावळ (12 जानेवारी 2025) : शहरातील श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळ संचलित जिजामाता प्राथमिक विद्या मंदिरात सोमवार, 12 जानेवारी रोजी जिजामाता जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष सोनू मांडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून नाट्यकलावंत उमेश गोरधे उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे सदस्य श्रीधर खणके तसेच शालेय समिती सदस्या स्मिता जोशी उपस्थित होत्या.
विद्यार्थ्यांनी केली कलागुणांची उधळण
दरवर्षी शाळेत जिजामाता जयंती निमित्त सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले जाते. यात इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांनी गणेश वंदना सादर केली. अनन्या देवडा व प्राची बढे या विद्यार्थिनींनी जिजामाता स्वगत सादर केले. गुंजन तळेले हिने भजन सादर केले.
शेतकरी गीत, सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचे महत्व सांगणारे शिक्षण गीत, दिंडी, भारुड, गोंधळ अशा पारंपारिक लोकगीतांवर विद्यार्थ्यांनी बहारदार नृत्य सादर केले. राम सिया राम, राजस्थानी गीत, ऑपरेशन सिंदूर नाटिका, छत्रपती संभाजी राजे यांच्या जीवनावर आधारित छावा नाटिका, स्वर्गात आकाशगंगा समूहगीत तसेच संविधान जागृतीपर पथनाट्य असे विविध कार्यक्रम सादर करण्यात आले.

कार्यक्रमास पालकांची प्रचंड उपस्थिती होती. कार्यक्रमात नाट्य कलावंत उमेश गोरधे यांनी आपल्या एकपात्री अभिनयाचे विद्यार्थी व पालकांसमोर सादरीकरण केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष सोनु मांडे यांनी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन मनीषा राजपूत यांनी तर आभार संध्या चौधरी यांनी मानले. यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका अलका सुरवाडे यांच्या मार्गदर्शनात सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी सहकार्य केले.

