भुसावळात युवा दिनानिमित्त द वर्ल्ड स्कूलतर्फे मॅरेथॉन


भुसावळ (12 जानेवारी 2026) : शहरातील कोलते फाऊंडेशन एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन संचलित ‘द वर्ल्ड स्कूल’ मध्ये स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त स्वदेशी संकल्प मॅरेथॉन स्पर्धेचे सोमवार, 12 रोजी आयोजन करण्यात आले.

युवकांमधील शारीरिक सृदृढता व राष्टीय समृद्धता या संकल्पनेनुसार पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्याची दोन किलोमीटर मॅरेथॉन धाव आयोजित करण्यात आली. तत्पूर्वी विद्यार्थ्यांना एकत्रीत करून स्वदेशी व विकसीत भारत, आत्मनिर्भर भारत संबंधित प्रतिज्ञा घेण्यात आली. मॅरेथॉन धाव पर्यवेक्षिका, क्रीडा शिक्षक, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !