भुसावळसह जळगाव जिल्ह्यातील 28 केंद्रावर 18 रोजी एमटीएस परीक्षा
The MTS exam will be held on the 18th at 28 centers in Jalgaon district, including Bhusawal. भुसावळ (12 जानेवारी 2026) के.एन.सी.टी.आय. भुसावळ संचलित जिल्हास्तरीय एमटीएस परीक्षा रविवार, 18 रोजी जिल्ह्यातील विविध 28 केंद्रांवर होणार आहे. या परीक्षेसंदर्भात वेळापत्रक, परीक्षा नंबर, परीक्षा केंद्र इत्यादी माहिती संबंधित शाळांना कळविण्यात आली आहे. सर्व परीक्षार्थींनी आपापल्या परीक्षा केंद्रावर रविवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत उपस्थित रहावे तसेच विद्यार्थ्यांना काही अडचण असल्यास त्यांनी 9890441895, 8999408636, 9028483542, 9307831824 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष डॉ.मकरंद नारखेडे, उपाध्यक्ष डॉ.किशोर नारखेडे, संस्था सेक्रेटरी पी.व्ही.पाटील, परीक्षा समिती प्रमुख व संगणक विभाग प्रमुख बी.ए.पाटील, पर्यवेक्षक एस.पी.पाठक, उपशिक्षक राहुल भारंबे, मनोज कुलकर्णी, एस.पी.झांबरे, सी.बी.जोगी व गणेश जगताप यांनी केले आहे.


