परसाडेतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत रंगला माजी विद्यार्थ्यांचा मेळावा


A reunion of former students was held at the Zilla Parishad Primary School in Parsade यावल (12 जानेवारी 2026) : यावल तालुक्यातील परसाडेतील जि.प.प्राथमिक शाळेत माजी विद्यार्थ्यांचा मेळावा झाला. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नत्थु तडवी व उपाध्यक्ष हसन तडवी यांच्या पुढाकाराने हा मेळावा झाल. या मेळाव्याला गावातील नोकरी व्यवसायानिमित्त बाहेरगावी असलेले शाळेचे माजी विद्यार्थी ते आज रोजी शाळेत असलेले आजी विद्यार्थी मोठ्या संख्येने एकत्र जमले होते.

जुन्या आठवणींना उजाळा
माजी विद्यार्थ्यांनी त्यावेळी असलेल्या आठवणींचा उजाळा दिला.त्यांचे अनुभव खरच प्रेरणादायी होते. त्यांचे शाळेविषयी असलेले प्रेम त्यावेळी जाणवून आले. अध्यक्षस्थानी माजी विद्यार्थी डॉ.राजू तडवी होते. मंत्रालयाचे सहाय्यक अधीक्षक मुकद्दर कलंदर तडवी, पोलीस पाटील मेहमूद तडवी, ग्रा.पं सदस्य रोशन सुभान तडवी, फातिमा तडवी, नसीमा तडवी, युनुस तडवी, ग्राम पंचायत अधिकारी, मजीत तडवी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नत्थु तडवी यांच्या उपस्थितीत हा मेळावा उत्साहाने पार पडला.

शिक्षक सुहास भालेराव, वाहक खालील तडवी, मुक्कदर तडवी, मजीत तडवी, मेहेक तडवी, गफूर तडवी या माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यात माजी विद्यार्थ्यांनी शाळेला वास्तुरुपात देणगी देऊन आश्वस्त केले तसेच काही माजी विद्यार्थ्यांनी देणगी स्वरूपात आर्थिक मदत सुद्धा केली. शाळेतील मुख्याध्यपिका उज्वला सोनार, शिक्षिका हसीना तडवी, कल्पना माळी व अजित तडवी यांनी परिश्रम घेतले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !