जबरी चोरीच्या गुन्ह्याची उकल : सावद्यातील सहाय्यक निरीक्षकांसह कर्मचार्‍यांचा जिल्हा पोलिस अधीक्षकांकडून गौरव


Robbery case solved: The assistant inspector and other personnel from Savda were felicitated by the District Superintendent of Police सावदा, ता.रावेर (13 जानेवारी 2026) : जबरी चोरीच्या गुन्ह्यात आरोपींना अटक करण्यासह त्यांच्याकडून मुद्देमालाची रिकव्हरी करणार्‍या सावदा पोलिस ठाण्यातील सहाय्यक निरीक्षक विशाल पाटील यांच्यासह कर्मचार्‍यांचा जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी गौरव केला.

गोपनीय माहितीवरून कारवाई
सावदा पोलीस स्टेशनला गुन्हा क्रमांक 284/2025, भारतीय न्याय संहीता कलम 309(4) प्रमाणे दाखल जबरी चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपअधीक्षक सुभाष ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली अल्प वेळेत कुठलीही उपयुक्त माहिती नसताना गोपनीय बातमीच्या आधारे आरोपी अब्बास इबाबत शेख इराणी व मोहम्मद अली उर्फ पद्दू काला अली इराणी यांना अटक करण्यात आली तसेच त्यांच्याकडून चोरीस गेलेला एक लाख 32 हजार किंमतीचा मुद्देमाल (23 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत) हस्तगत करून गुन्ह्याची उकल करण्यात आली होती. आरोपींकडून दुचाकी जप्त करीत मलकापूर पोलीस स्टेशन येथील गुन्हा देखील उघडकीस आणल्याने पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी सावदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील, पोलीस हवालदार संजीव एकनाथ चौधरी, निलेश बाविस्कर व मयूर पाटील यांचा सन्मानपत्र देवून गौरव केला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !