भुसावळातील हिंदी सेवा मंडळाचा अमृत महोत्सव उत्साहात


The Hindi Seva Mandal of Bhusawal celebrated its Amrit Mahotsav (platinum jubilee) with great enthusiasm भुसावळ (13 जानेवारी 2026) : शहरातील हिंदी सेवा मंडळाचा अमृत महोत्सव मंगळवार, 13 जानेवारी रोजी साजरा करण्यात आला. यावेळी हिंदी सेवा मंडळाचे अध्यक्ष मिलिंद अग्रवाल, सीओईपी टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी पुण्याचे कुलगुरु डॉ.एस.जे.भिरूड, मुख्य विभागीय रेल्वे प्रबंधक पुनीत अग्रवाल उपस्थित होते.

उल्लेखनीय यश मिळवणार्‍यांचा सत्कार
यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणार्‍या विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. हिंदी सेवा मंडळाच्या अंतर्गत येणार्‍या विविध विद्यालयांचे सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करण्यात आले. प्रसंगी विविध प्रकारचे प्रकल्प विद्यार्थी आणि शिक्षकांनी सादर केले. प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना सातत्याने परिश्रम करण्याचा व संस्कारयुक्त शिक्षण घेण्याचा संदेश दिला. सूत्रसंचालन गिरीश कुलकर्णी तर आभार दे.ल.हिंदी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य एम.आर.माहेश्वरी यांनी केले. यशस्वी होण्यासाठी शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !