मुंबईत होणार सत्तापालट ! : एक्झिट पोलमध्ये भाजपला 130-150 जागा
ठाकरे बंधूंना धक्का भाजप-शिवसेना सत्तेत येण्याची चिन्हे
A change of power is imminent in Mumba i! : Exit polls predict 130-150 seats for the BJP मुंबई (15 जानेवारी 2026) : मुंबई महापालिकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी सर्वच पक्षांनी ताकद लावली तर या निवडणुकीसाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले. राज ठाकरे यांनी मराठीचा मुद्दा उपस्थित करत मराठी माणसाला भावनिक साद घालण्याचा प्रयत्न केला तसेच ठाकरे बांधूंच्या सभांना लोकांनी चांगलाच प्रतिसाद दिला होता परंतु, एक्जिट पोलच्या समोर आलेल्या आकड्यानुसार मुंबईत सत्तापालट होण्याची शक्यता आहे.
असा आहे एक्झीट पोलचा अंदाज
जनमतच्या एक्जिट पोलनुसार मुंबईत सत्तापालट होणार असल्याचे म्हटले आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाला 138 जागा मिळतील, असा अंदाज आहे तसेच शिवसेन ठाकरे गट, मनसे आणि शरद पवार गटाला 62 जागा मिळणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच काँग्रेस-वंचितला 20 तर इतरांना सात जागा मिळतील, असा अंदाज आहे.

रुद्र रिसर्चनुसार, मुंबईत भाजप आणि शिवसेना शिंदे गटाला 121 जागा मिळतील तर शिवसेना ठाकरे गट आणि मनसे युतीला 71 जागा मिळतील. काँग्रेस आणि वंचितच्या आघाडीला मुंबईत 25 जागा मिळतील, तर इतरांना 10 जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
कल्याण-डोंबिवलीत शिवसेना शिंदे गटाचे वर्चस्व
सामच्या एक्झिट पोलनुसार, वसई विरारमध्ये भाजपला 27, शिवसेना शिंदे गटाला 5, काँग्रेसला 3, शिवसेना ठाकरे गटाला 7, वंचितला 72 जागा मिळण्याची शक्यता आहे. कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेमध्ये शिवसेना शिंदे गटाला 57 जागा मिळण्याची शक्यता आहे. भाजप 42 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. मनसे 6 जागांवर, काँग्रेस 2 जागांवर, शिवसेना ठाकरे गट 2 जागांवर, राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागांवर, वंचित बहुजन आघाडी 2 जागांवर आणि इतर 6 जागांवर विजयी होण्याची शक्यता आहे.
उल्हासनगरमधला अंदाज
उल्हासनगरमध्ये भाजपाला 28, शिवसेना शिंदे गटाला 29 तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 4 जागा मिळू शकतात. तसेच इतरांच्या स्थानिक जागा आहेत त्यांना 12, काँग्रेसला 2, शिवसेना ठाकरे गटाला 1, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला 15, तर मनसेला 2 जागा मिळण्याची शक्यता दर्शवण्यात आली आहे.
पिंपरीत भाजपची सत्ता?
पिंपरीचा देखील एक्जिट पोल समोर आला असून इथे देखील भाजपला जास्त मते मिळत असल्याचा अंदाज ‘प्राब’ने वर्तवला आहे. प्राबने दिलेल्या आकडेवारीनुसार, पिंपरीमध्ये भाजपला 24, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 51, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 9 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर शरद पवार गटाला 2, शिवसेना ठाकरे गटाला शून्य, मनसेला एक तर वंचितला शून्य जागा मिळणार आहे.
पुण्यात भाजपला 93 जागा मिळण्याचा अंदाज
‘प्राब’नुसार पुण्यात भाजपला 93, शिवसेना शिंदे गटाला 6, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 43 जागा मिळणार असल्याचा अंदाज आहे. तसेच शिवसेना ठाकरे गटाला 7, शरद पवार गटाला 8, काँग्रेसला 8 आणि मनसेला शून्य जागा मिळणार असल्याचा अंदाज प्राबने वर्तवला आहे.
कोल्हापूरचा एक्झिट पोल
जेडीएसच्या एक्झिट पोलनुसार, कोल्हापुरात भाजपला 29-32, शिवसेना शिंदे गटाला 18-21, राष्ट्रवादी अजित पवार गटाला 9-11 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला 19-23, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 0-1, शिवसेना ठाकरे गटाला 3-4, मनसेला 0-1, तर इतरांना 2-4 जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

