अनुष्का पाटोळे हत्येतील आरोपींवर कठोर कारवाई व्हावी : भुसावळात प्रांतांना निवेदन
A memorandum was submitted to the Sub-Divisional Officer in Bhusawal demanding strict action against the accused in the Anushka Patole murder case भुसावळ (20 जानेवारी 2026) : लातूर नवोदय विद्यालयात शिक्षण घेत असलेली अत्यंत हुशार, प्रामाणिक, स्वाभिमानी विद्यार्थिनी अनुष्का पाटोळे (12) हिचा घातपात घडवून हत्या करण्यात आल्याने या प्रकरणातील दोषींवर लवकर कारवाई करून कठोर शिक्षा द्यावी व कुटूंबियांना योग्य न्याय मिळावा, या मागणीसाठी भुसावळातील अनुसूचित जाती मोर्चा शहराध्यक्ष संतोष ठोकळ यांच्या सोबत सर्व समाजबांधवांनी भुसावळ प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांना निवेदन दिले.
यावेळी माजी शहराध्यक्ष राहुल वसंत तायडे यांनी स्वतः या प्रकरणात कटाक्षाने लक्ष देऊन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्याकडे या संदर्भात कायदेशीर दिशेने कारवाई करून घेणार असल्याचे मत व्यक्त केले.








