!-- afp header code starts here -->

भुसावळातील के.नारखेडे विद्यालयात एमटीएस परीक्षा शांततेत


भुसावळ (20 जानेवारी 2026) : के.एन.सी.टी.आय एमटीएस जिल्हास्तरीय परीक्षा (इयत्ता चौथी व सातवी) शहरातील के.नारखेडे विद्यालयासह जिल्ह्यातील 28 केंद्रावर शांतते पारप डली.

याप्रसंगी के.नारखेडे विद्यालयात संस्था सेक्रेटरी पी.व्ही.पाटील, संस्थेचे ऑनररी जॉईंट सेक्रेटरी प्रमोद नेमाडे, मुख्याध्यापिका संगीता अडकमोल मॅडम, संगणक विभाग प्रमुख व परीक्षा समिती प्रमुख बी.ए.पाटील, पर्यवेक्षक एस.पी.पाठक इत्यादी उपस्थित होते. याप्रसंगी इयत्ता चौथी व सातवीचे मिळून एकूण 404 विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट होते. यापैकी परीक्षेला 387 विद्यार्थी उपस्थित होते.

परीक्षा यशस्वीतेसाठी एस.एम.चिपळूणकर, मनोज कुलकर्णी, सी.बी.जोगी, दिनेश गायकवाड, निखील बर्‍हाटे, प्रदीप सपकाळे, रवी बादशाह, मुकेश पाटील यांनी परिश्रम घेतले.


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !