!-- afp header code starts here -->

जळगावच्या बाफना ज्वेलर्समधून अडीच लाखांची सोन्याची चैन लांबवली


A gold chain worth two and a half lakhs was stolen from Bafna Jewellers in Jalgaon जळगाव (20 जानेवारी 2026) : जळगावातील ‘रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स’ (नयनतारा अ‍ॅण्ड सन्स) मधून अडीच लाख रुपये किंमतीची चैन लांबवण्यात आली. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

काय आहे प्रकरण ?
ही घटना शुक्रवार, 9 जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. फिर्यादी गणेश राजाराम कोळे (49, रा.अयोध्या नगर, जळगाव) हे या शोरूममध्ये मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत, त्यांनी 19 जानेवारी 2026 रोजी रात्री यासंदर्भात रीतसर फिर्याद दिली.

अज्ञात चोरट्याने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी, फिर्यादीच्या संमतीशिवाय ही सोन्याची चेन लबाडीच्या इराद्याने चोरून नेली. या तक्रारीवरून शनीपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तपास पोलीस निरीक्षक कावेरी एम.कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल श्रीराम बोरसे करत आहेत.


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !