निलंबन टाळण्यासाठी फोन पे द्वारा 15 हजारांची लाच : अहिरवाडी वनपाल व खाजगी पंटर जळगाव एसीबीच्या जाळ्यात
गणेश वाघ
To avoid suspension, a bribe of Rs. 15,000 was demanded via PhonePe: Ahirwadi forest guard and a private agent caught in the net of Jalgaon ACB भुसावळ (20 जानेवारी 2026) : वनविभागाच्या वनरक्षकावर निलंबनाची कारवाई टाळण्यासाठी 15 हजारांची लाच फोन पे द्वारे लाच स्वीकारणार्या रावेर तालुक्यातील अहिरवाडी वनक्षेत्रातील वनपाल राजेंद्र अमृत सरदार व खाजगी पंटर दीपक रघुनाथ तायडे यांना जळगाव एसीबीने मंगळवार, 20 रोजी सायंकाळी अटक केल्याने वनविभागातील लाचखोर हादरले आहेत. या कारवाईने वनविभागातील वरिष्ठ अधिकार्यांची चौकशी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
असे आहे लाच प्रकरण
तक्रारदार हे वनविभागात वनरक्षक असून रावेर विभागातील जीन्सी येथे कार्यरत असताना वनपरिक्षेत्र अधिकारी संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन, यावल यांनी 5 व 6 सप्टेंबर 2024 त्यांच्या कार्यक्षेत्रातील रोप वनातील निंदणी कामाची तपासणी केली. यावेळी अहिरवाडी वनपाल राजेंद्र सरदार यांनी व्हॉटसअॅप कॉलद्वारे 7 रोजी निंदणीच्या कामातील त्रृटीमुळे निलंबन होणार असल्याची बतावणी केली होती मात्र निलंबन टाळायचे असल्यास रावेर वनपरिक्षेत्र अधिकारी अजय बावने यांना 15 हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगून लाचेची रक्कम दीपक तायडे यांच्या फोन पे पाठवण्यास सांगितले होते मात्र तक्रारदाराकडै फोन पे नसल्याने त्यांनी एसीबीआयच्या योनो अॅपद्वारे 13 हजार 250 रुपये तायडे यांना पाठवत स्क्रीन शॉट सरदार यांना पाठवला होता व रक्कम मिळाल्याचा दुजोरा त्यांना मिळाला तर 8 सप्टेंबर 2024 तक्रारदाराने आरोपी सरदार यांच्या निवासस्थानी जावून 1750 रुपये रोख दिले.

लाचेनंतरही झाले निलंबन
12 सप्टेंबर 2024 रोजी प्रादेशिक वनसंरक्षक, धुळे यांनी तक्रारदार वनरक्षकाला जीन्सी रोपवनातील निंदणीचे काम न केल्याने निलंबित केले व त्यानंतर 15 सप्टेंबर रोजी तक्रारदाराने आरोपीची भेट घेतली असता निलंबनातून मुक्त करण्यासाठी वरिष्ठांची भेट घेतो मात्र त्यासाठी पुन्हा पैसे लागतील, असे सांगितल्याने तक्रारदाराने जळगाव एसीबीकडे 16 ऑक्टोबर 2024 रोजी तक्रार दिली होती. वरिष्ठ अधिकार्यांच्या नावाने लाच मागणे, प्रभाव पाडणे व भ्रष्ट मार्गाने लाच मिळवल्याने दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला व आरोपींना मंगळवारी सायंकाळी अटक करण्यात आली.
यांनी केला सापळा यशस्वी
जळगाव एसीबीचे डॅशिंग पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक हेमंत नागरे, उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील, हवालदार किशोर महाजन, कॉन्स्टेबल प्रदीप पोळ, कॉन्स्टेबल राकेश दुसाने व पथकाने हा सापळा यशस्वी केला.







