भुसावळातील प्रभाग आठमध्ये हवी कचराकुंडी : प्रशासनाला निवेदन
A garbage bin is needed in ward eight of Bhusawal: A request submitted to the administration भुसावळ (20 जानेवारी 2026) : भुसावळातील जळगाव रोडवरील प्रभाग क्रमांक 8 मधील रिंग रोडवर धन्वंतरी मेडिकलच्या समोरील बाजूला सध्या कचरा टाकण्यासाठी अधिकृत व्यवस्था किंवा कचराकुंडी नसल्याने नागरिक रस्त्याच्या कडेलाच कचरा टाकतात. परिणामी परिसरात दुर्गंधी पसरत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
काही भागात घंटागाडी वेळेवर किंवा नियमित येत नसल्याने नोकरी व्यवसायानिमित्त बाहेर जाणारे नागरिक कचरा कॅरीबॅगमध्ये भरून रस्त्यावर आणून टाकतात.



