!-- afp header code starts here -->

नऊ हजारांचे लाच प्रकरण : धुळे जात पडताळणी कार्यालयातील कनिष्ठ लिपिकासह प्रकल्प सहाय्यकाची पोलिस कोठडी रवानगी


धुळे (21 जानेवारी 2026) : ओबीसी जात प्रमाणपत्राची पडताळणी करून देण्यासाठी नऊ हजारांची लाच मागून ती स्वीकारताना धुळे जात पडताळणी कार्यालयातील कनिष्ठ लिपिक प्रमोद पाटील व प्रकल्प सहाय्यक इम्रान अन्सारी यांना धुळे एसीबीने सोमवार, 19 रोजी सायंकाळी अटक केली होती. दोघा लाचखोरांना मंगळवारी धुळे न्यायालयात हजर केले असता त्यांना एका दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

असे आहे लाच प्रकरण
तक्रारदाराच्या शालकाचे ओबीसी जातीचे प्रमाणपत्र पडताळणी करून मिळण्यासाठी 21 रोजी जून 2025 रोजी ऑनलाईन मूळ अर्ज व आवश्यक कागदपत्र संबंधित कार्यालयाकडे जमा करण्यात आले होते. तक्रारदाराने प्रमाणपत्र मिळण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला मात्र प्रकल्प सहाय्यक इम्रान अन्सारी याने जात पडताळणीचे काम करून देण्यासाठी 12 हजारांची लाच मागून सुरुवातीला तीन हजार रुपये फोन पे द्वारा स्वीकारले मात्र दोन महिने होवूनही काम न झाल्याने तक्रारदाराने संपर्क साधला असता नऊ हजार रुपये लाच दिल्याशिवाय काम होणार नाही, असे सांगितल्याने धुळे एसीबीकडे तक्रार नोंदवण्यात आली. कनिष्ठ लिपिक प्रमोद पाटील यांनी लाच मागणीला प्रोत्साहन दिले. सोमवारी सायंकाळी कार्यालयात लाच स्वीकारताच संशयीतांना अटक करण्यात आली होती.

लाचखोरांची कोठडीत रवानगी
लाच प्रकरणी अटकेतील कनिष्ठ लिपिक प्रमोद पाटील व प्रकल्प सहाय्यक इम्रान अन्सारी यांना धुळे न्यायालयात हजर केले असता एका दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. अधिक तपास धुळे एसीबीचे डॅशिंग पोलिस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक पद्मावती कलाल व सहकारी करीत आहेत.


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !