!-- afp header code starts here -->

मंत्री संजय सावकारेंचा पाठपुरावा : भुसावळ तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये क्रीडांगण/पटांगण निर्मितीस मंजुरी


Minister Sanjay Savkare’s follow-up: Approval granted for the construction of playgrounds/sports grounds in Zilla Parishad primary schools in Bhusawal taluka भुसावळ (21 जानेवारी 2026) : भुसावळ तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने क्रीडांगण / पटांगण निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या अर्थसंकल्पीय निधीस प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे.

मंत्र्यांच्या पाठपुराव्याला यश
जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व भुसावळ तालुक्याचे आमदार तथा वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या प्रयत्नातून सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना 2025-26 अंतर्गत सदर कामांसाठी निधी मंजूर करण्यात आला.

येथे होणार क्रीडांगण
या योजनेंतर्गत भुसावळ तालुक्यातील फुलगाव, साकरी, वेल्हाळे, साकेगाव, तळवेल, कुर्‍हा पानाचे व टहाकळी या संपूर्ण गावांमधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्याठिकाणी क्रीडांगण / पटांगणाची निर्मिती करण्यात येणार आहे.

या सुविधांमुळे विद्यार्थ्यांना खेळासाठी आवश्यक सोयी उपलब्ध होणार असून, त्यांच्या शारीरिक, मानसिक तसेच शैक्षणिक विकासाला निश्चितच चालना मिळणार आहे.

मंजूर निधी प्राप्त झाल्यानंतर संबंधित ठिकाणी लवकरात लवकर काम सुरू करण्यात येणार असून, कामाची गुणवत्ता व वेळेची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल, असे जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व भुसावळ तालुक्याचे आमदार तथा वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे म्हणाले.


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !