!-- afp header code starts here -->

भुसावळात तरुणांना वाचवताना कंटेनर दुभाजकावर आदळला : चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला


In Bhusawal, a container truck crashed into a divider while trying to save some young men ; a major accident was averted due to the driver’s quick thinking भुसावळ (21 जानेवारी 2026) : शहरातील राष्ट्रीय महामार्गावर वांजोळा रोडकडे वळणार्‍या रस्त्याजवळ मंगळवारी सायंकाळी 5.40 वाजेच्या सुमारास महामार्ग ओलांडत असलेल्या तीन तरुणांना वाचवण्याच्या प्रयत्नात एका कंटेनरने थेट रस्त्याच्या दुभाजकावर जाऊन जोरदार धडक दिली. सुदैवाने या अपघातात तिन्ही तरुण बालंबाल बचावले.

काय घडले भुसावळात ?
राजस्थानातील कोटा येथे जात असलेला कंटेनर (जी.जे.17 एल.ए.5637) समोर तीन युवक आले. युवक वाहनापुढे येत असल्याचे लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखत तरुणांना वाचवण्यासाठी वाहन थेट समोरच्या भिंतीकडे व दुभाजकावर वळवले त्यामुळे मोठा अनर्थ टळला. संबंधित तिन्ही तरुण शहरातीलच रहिवासी असल्याची माहिती आहे मात्र अपघातानंतर हे तरुण घटनास्थळावरून बेपत्ता झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

माजी आमदारांची धाव
घटनेची माहिती मिळताच नगराध्यक्ष गायत्री भंगाळे, माजी आमदार संतोष चौधरी तसेच त्यांच्या सहकार्‍यांनी घटनास्थळी पाहणी केली. यावेळी महामार्गावरील अनधिकृत शॉर्टकट रस्ते तत्काळ बंद करण्याची मागणी करण्यात आली. महामार्गावरील शॉर्टकट बंद केल्यास अनेक निष्पाप नागरिकांचे जीव वाचू शकतात, असे मत व्यक्त करण्यात आले. दरम्यान, या ठिकाणी वारंवार अपघात घडत असल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !