!-- afp header code starts here -->

30 हजारांची लाच भोवली : धुळे नगररचना विभागातील सहा.रचनाकार, सहा.आरेखकासह जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल सहाय्यक एसीबीच्या जाळ्यात


गणेश वाघ
Bribes of 30,000 rupees proved costly : An assistant town planner and an assistant draftsman from the Dhule Town Planning Department, along with a revenue assistant from the Collector’s office, were caught in the ACB’s net. भुसावळ (21 जानेवारी 2026) : औद्योगिक प्रयोजनासाठी जमीन बिनशेती मंजूर करण्यासाठी तडजोडीअंती 30 हजारांची लाच मागून ती स्वीकारताना धुळ्यातील नगर रचना विभागातील सहाय्यक रचनाकार कल्पेश धनलाल मोरे (28, वर्ग 2), सहा.आरेखक किशोर भटा भोई (43, वर्ग 3) व धुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल सहाय्यक दीपक आनंद हटकर (40) यांना धुळे एसीबीने बुधवार, 21 रोजी सायंकाळी रंगेहाथ अटक केली आहे. या कारवाईने दोन्ही बड्या विभागातील लाचखोरांची साखळी समोर आल्याने धुळे जिल्ह्यातील लाचखोर प्रचंड धास्तावले आहेत. विशेष म्हणजे अटकेतील संशयीत हे वर्ग दोन व वर्ग तीनचे बडे अधिकारी आहेत.

असे आहे लाच प्रकरण
तक्रारदार यांच्या वडिलांच्या नाव शेतजमीन आहे. त्यातील दहा हजार चौरस मीटर क्षेत्राला औद्योगिक प्रयोजनासाठी बिनशेती मंजूर होण्यासाठी तक्रारदाराने वडिलांच्या नावे 31 ऑक्टोबर 2026 रोजी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात ले आऊट व आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन प्रकरण सादर केले तसेच ऑफलाईन मूळ कागदपत्रेही सादर केली.

धुळे जिल्हाधिकारी कार्यालयातून हे प्रकरण ले आऊट मंजुरीसाठी धुळे नगररचना विभागाकडे पाठवण्यात आले. ले आऊट मंजुरीसाठी सहा.आरेखक भोई याने स्वतःसह चौरे याच्यासाठी 50 हजारांची लाच मागून दहा हजार रुपये भोई यांनी ऑनलाईन स्वीकारत उर्वरीत 40 हजार काम झाल्यावर देण्याचे सांगितले होते. याच प्रकरणात धुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल सहाय्यक आनंदा हटकर यानेदेखील बिनशेती आदेश देण्यासाठी 20 हजार रुपये लाचेची मागणी केल्याने धुळे एसीबीकडे तक्रार नोंदवण्यात आली. 13 रोजी लाच पडताळणीत लाच मागणी सिद्ध झाल्यानंतर बुधवार, 21 रोजी धुळे एसीबीने सापळा रचला. चौरे याने तक्रारदाराकडून 30 हजार रुपये स्वीकारल्यानंतर नंतर दोन्ही लाचखोरांनाही पकडण्यात आले.

यांनी केली कारवाई
ही धाडसी कारवाई धुळे एसीबीचे डॅशिंग पोलिस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक यशवंत बोरसे, पोलिस निरीक्षक पद्मावती कलाल, हवालदार राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, प्रवीण मोरे, मकरंद पाटील, प्रवीण पाटील, प्रशांत बागुल, सागर शिर्के, प्रितेश चौधरी, रेशमा चौधरी, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर आदींच्या पथकाने केली.

लाचखोर हादरले : धुळे एसीबीची नववर्षात पाचवी कारवाई
धुळे जिल्ह्याती लाचखोरांविरोधात धुळे एसीबीने मोहिम तीव्र केल्याने लाचखोरांनी धसका घेतला आहे. नववर्षाच्या सुरूवातीला तब्बल चार बड्या कारवाया एसीबीने केल्यानंतर आता धुळे जिल्हाधिकारी कार्यालय तसेच नगररचना विभागातील साखळीच कारवाईनिमित्ताने समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

शासकीय करून देण्यासाठी कुणीही लाच मागत अथवा घेत असल्यास धुळे एसीबीकडे तक्रार करावी, असे आवाहन पोलिस उपअधीक्षक सचिन साळुंखे (मो.94037-47157) यांनी केले आहे.


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !