!-- afp header code starts here -->

किनगावचे राजू कंखरे यांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार


यावल (21 जानेवारी 2026) : महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेच्या वतीने महात्मा ज्योतिराव फुले स्मृतिदिन प्रित्यर्थ जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे झाला.

यांची होती उपस्थिती
या सोहळ्याला जेष्ठ साहित्यिक उत्तमजी कांबळे, परिषदेचे अध्यक्ष डॉ. डी. के. अहिरे, शिक्षक आमदार, नाशिक विभाग चे किशोरजी दराडे यांची उपस्थिती होती. यात यावल तालुक्यातील किनगाव येथील नेहरू विद्यालयाचे शिक्षक राजू रघुनाथ कंखरे यांना समता शिक्षक परिषदेचा गुणवंत शिक्षक पुरस्कार देवून सन्मानीत करण्यात आले.

हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे संस्थेचे मानद सचिव निलेश भोईटे, नेहरू विद्यालयाचे चेअरमन उमाकांत पाटील, विद्यालयाचे मुख्याध्यापक रविंद्र सोनवणे तसेच विद्यालयाचे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !