शिरपूर-चोपडा रस्त्यावर भीषण अपघातात दाम्पत्य ठार

नातवाला भेटून परतणार्‍या दाम्पत्यावर काळाचा आघात : भरधाव कार दुचाकीवर आदळली


A couple was killed in a horrific accident on the Shirpur-Chopda road शिरपूर (22 जानेवारी 2026) : आडगाव येथे नातवाला भेटण्यासाठी गेलेल्या दाम्पत्याचा भीषण अपघातात मृत्यू झाला. हा अपघात
शिरपूर-चोपडा रस्त्यावरील सावेर गावाजवळ घडला. भरधाव कार दुचाकीवर आदळल्याने जयदेव गोकुळ गुजर (48) व त्यांच्या पत्नी प्रतिभा जयदेव गुजर (40, निमझरी) असे ठार झालेल्यांची नावे आहेत.

भरधाव कार दुचाकीवर आदळली
निमझरीतील गुजर दाम्पत्य चोपडा तालुक्यात नातेवाईकांकडे साखरपुड्यासाठी गेल्यानंतर आडगावातील आपल्या नातवाला भेटण्यासाठी गेले व परतीच्या प्रवासात सावेर येथील पेट्रोल पंपासमोर समोरून येणार्‍या कारने (एम.एच.19 ई.पी.2869) ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दाम्पत्य जागीच ठार झाले तर सुदैवाने कारमधील एअरबॅग्स उघडल्यामुळे त्यातील पती, पत्नी आणि चिमुकली सुदैवाने बचावले. थाळनेर सहाय्यक निरीक्षक हेमंत पाटील यांनी घटनास्थळाची पाहणी केली. मृत दाम्पत्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, मुलगा, सून आणि दीड महिन्याच्चा नातू असा परिवार आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !