भुसावळात हिंदूहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे जयंती उत्साहात


भुसावळ (23 जानेवारी 2026) : भुसावळातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे बाजारपेठ पोलिस स्टेशन चौकात हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती विविध समाजोपयोगी कार्यक्रम व प्रतिमा पूजन करून साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन शहर प्रमुख गणेश चौधरी (सोनवणे) यांनी केले.

यांची होती उपस्थिती
शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत शर्मा व लोकनियुक्त नगराध्यक्ष गायत्री भंगाळे यांच्याहस्ते प्रतिमा पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. कट्टर शिवसैनिक शिवभोजन केंद्र चालक उमाकांत शर्मा (नमा) व मुलगा पियुष शर्मा यांच्या वतीने 125 थाळी गोर गरीब गरजू लोकांना स्टेशन रोड जवळ शिवभोजन मोफत देण्यात आले. पालक पनीर भाजी, चपाती, वरण भात, आणि बुंदी लाडू वाटप करण्यात आले.

शिवसेना शहर प्रमुख गणेश सोनवणे यांनी यांच्या वतीने गोर गरीब गरजूंना कांबळ (ब्लँकेट) वाटप करण्यात आले. प्रा.उत्तम सुरवाडे, प्रा. दिलीप सुरवाडे, शहरप्रमुख मकबूल शेख, उज्वला बागुल, नगरसेवक सचिन पाटील, अकिल पिंजारी, सिकंदर भाई, योगेश बागुल, रमेश खरारे, नाना मोरे, निलेश चौधरी, अनुप खोब्रागडे, मनसे शहराध्यक्ष दीपक सोनवणे व असंख्य सर्वपक्षीय कार्यकर्ते, पदाधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. शिवसेना भुसावळ शहर व सहकार्‍यांनी परिश्रम घेतले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !