भुसावळातील डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये वसंत पंचमी उत्साहात


भुसावळ (23 जानेवारी 2026) : शहरातील डॉ.उल्हास पाटील सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शुक्रवारी वसंत पंचमी उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी स्कूलच्या प्रिन्सिपल अनघा पाटील यांनी सरस्वती मातेचे पूजन केले. नेताजी सुभाषचंद्र बॉस यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

प्रसंगी प्रिंसीपल अनघा पाटील यांनी विद्यार्थी व विद्यार्थिनींना वसंत पंचमी व सुभाषचंद्र बॉस यांच्या जयंतीनिमित्त मार्गदर्शन केले. यावेळी स्कुलमधील पंकजा कुलकर्णी, पूनम कुंडु, रुची जाधव, स्वप्नाली वैराळ यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन पूनम कुंडू यांनी तर आभार रूची जाधव यांनी मानले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !