भुसावळातील ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये वसंत पंचमी उत्साहात
भुसावळ (23 जानेवारी 2026) : शहरातील ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये स्वातंत्र्यसेनानी सुभाषचंद्र बोस जयंती तसेच हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले.
ताप्ती पब्लिक स्कूलच्या प्रिंसीपल निना कटलर यांनी सरस्वती मातेचे पूजन केले तसेच सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुषहार अर्पण केला.
प्रसंगी ताप्ती पब्लिक स्कूलच्या व्हा.प्रिंसीपल श्रद्धाली घुले, मनप्रीत कौर, हर्षला पाटील, सोनाली मुजूमदार यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
शाळेच्या प्रिन्सिपल निना कटलर यांनी विद्यार्थ्यांना वसंत पंचमीचे महत्व सांगून तसेच सुभाष चंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल मार्गदर्शन केले. सूत्रसंचलन श्रद्धाली घुले तर आभार निना कटलर यांनी मानले.

