भुसावळातून नांदेड, सांगलीतील समागमासाठी भाविक रवाना
वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारेंनी केली प्रवासाची व्यवस्था
Devotees depart from Bhusawal for the religious gathering in Nanded and Sangli भुसावळ (24 जानेवारी 2026) : श्री गुरु तेग बहादूर साहिब यांच्या 350 व्या शहिद समागमानिमित्ताने आयोजित हिंद दी चादर या नांदेड येथे होणार्या कार्यक्रमासाठी शहरातील शेकडो भाविक शुक्रवारी रवाना झाले. वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या माध्यमातून बांधवांसाठी मोफत प्रवास करता यावा, म्हणून तीन ट्रॅव्हल्सची व्यवस्था करुन देण्यात आली होती.
आजपासून दोन दिवस कार्यक्रम
हिंद दी चादर या श्रीगुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहिद समागन नांदेड येथील मोदी मैदान वाघाळा, नांदेड येथे 24 व 25 जानेवारी रोजी होणार आहे. या निमित्ताने शहरातील गुरुव्दारा संगत साहेबपासून शहर व तालुक्यातील भाविकांची निशुल्क प्रवासाची व्यवस्था वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या माध्यमातून करुन देण्यात आली. शुक्रवारी मंत्री संजय सावकारे, प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे यांच्या हस्ते या निशुल्क प्रवासाचे उद्घाटन झाले. यावेळी भाजपचे गटनेते युवराज लोणारी, नगरसेवक किरण कोलते, महेंद्रसिंग ठाकूर, ड. बोधराज चौधरी आदींसह भाजपचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते. या सेवेचा शहरासह मांडवेदीगर व तालुक्यातील गावांमधील भाविकांनी लाभ घेतला. 24 व 25 जानेवारीला कार्यक्रमानंतर हे भाविक परतणार आहेत.
निरंकारी समागमसाठी रवाना
भुसावळ शहरासह विभागातून सांगली येथे होणार्या निरंकारी संत समागमासाठी देखील शुक्रवारी भाविक रवाना झाले. स्पेशल रेल्वे गाडी क्रमांक 01209 या विशेष गाडीला मंत्री संजय सावकारे यांनी हिरवी झेंडी दाखवली. यावेळी रजनी सावकारे, डीआरएम पुनीत अग्रवाल, अजय नागराणी आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. रेल्वे स्थानकावरुन सांगलीकडे समागम कार्यक्रमासाठी शेकडो भाविक रवाना झाले आहेत.

