भुसावळातील दोन विद्यार्थ्यांची 28 जानेवारीच्या पीएम रॅलीसाठी निवड
Two students from Bhusawal have been selected for the PM’s rally on January 28 भुसावळ (24 जानेवारी 2026) : भुसावळातील पु.ओं.नाहाटा महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांची गणराज्य दिनानंतर दिल्लीत सादर होणार्या 28 जानेवारीच्या पीएम रॅलीसाठी (परेड) निवड करण्यात आली आहे. प्रजासत्ताकदिनी कर्तव्यपथावर आपल्या सैन्यदलाची ताकद दाखवली जाते. यामध्ये सैन्याच्या विविध तुकड्यांकडून परेडद्वारे मानवंदना दिली जाते तर त्यानंतरच्या दोन दिवसांनी 28 रोजी पीएम रॅली (परेड) काढण्यात येते.
भुसावळचा विद्यार्थ्यांनी वाढवला नावलौकीक
भुसावळातील नाहाटा महाविद्यालयाचा विद्यार्थी तेजस विलास वाघोडे
हा महाराष्ट्र 18 बटालियनमध्ये ज्युनिअर अंडर ऑफीसर असून त्याची 26 जानेवारीच्या परेडसाठी निवड झाली आहे. पथकातील त्याचे स्थान फ्रंट लाईन, दुसरा डावीकडील मार्कर असेल.
या शिवाय नाहाटा महाविद्यालयातील समीक्षा गोपालराव पवार हे एनसीसी महाराष्ट्र बटालियनची ज्युनिअर अंडर ऑफीसरदेखील परडेमध्ये सहभागी होईल. पथकातील स्थान:महाराष्ट्र कॉन्टिजंट, फ्रंट लाईन कमांड करीत.
भुसावळातील दोन्ही विद्यार्थी एनसीसीच्या माध्यमातून वायुसेना आणि नौसेना यांच्या संचलन पथकासोबत होणार्या परेडमध्ये सहभागी होणार आहे. भुसावळच्या विद्यार्थ्यांची निवड झाल्यानंतर भुसावळातील अर्जुना संस्थेचे अध्यक्ष नंदकिशोर पंड्या यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.

