भुसावळ नगराध्यक्षांची राजकीय कुरघोडी : शिक्षण सभापतींसह उपनगराध्यक्षांना ध्वजारोहणापासून डावलले
भुसावळातील भाजपा गटनेता युवराज लोणारींचा लेटर बॉम्ब : नगराध्यक्षा म्हणाल्या, आरोप तथ्यहिन
Political maneuvering by the Bhusawal Municipal Council President : The Education Committee Chairman and the Deputy Mayor were excluded from the flag-hoisting ceremony भुसावळ (24 जानेवारी 2026) : भुसावळ पालिकेत सत्ताबदल झाल्यानंतर राजकारण पेटले आहेत. त्यातच सोमवार, 26 रोजी गणराज्य दिनानिमित्त होणार्या ध्वजारोहणात शिक्षण सभापती तसेच उपनगराध्यक्षांना डावलून भुसावळ नगराध्यक्षा गायत्री गौर-भंगाळे यांनी राजकीय कुरघोडी केल्याचा प्रकार निषेधार्थ असल्याचा लेटर बॉम्ब भाजपा गटनेता युवराज लोणारींनी टाकला आहे. नगराध्यक्षांच्या कृतीमागे ‘झारीतला शुक्राचार्य’ असल्याचा दावा लोणारींनी करीत खळबळ उडवून दिली आहे.
नगराध्यक्षांनी ध्वजारोणासाठी डावलल्याचा प्रकार म्हणजे राजकीय कुरघोडी
गटनेता लोणारी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रानुसार, देशभरात सोमवार, 26 जानेवारी 2026 रोजी देशाचा गणतंत्र दिवस साजरा होत आहे. नगरपरीषदेच्या आजवरच्या इतिहासांत महाराष्ट्र दिन, गणतंत्र दिन तसेच स्वातंत्र दिनी ध्वजारोहण होते. नगरपालिकेच्या मुख्य कार्यालयांत पालिकेचे नगराध्यक्ष ध्वजारोहण करीत असतात तसेच पाणीपुरवठा केंद्रात पाणीपुरवठा व जलनिस्सारण समापती, नगरपालिका दवाखान्यांत आरोग्य समिती सभापती न.पा.संचलित द.शि. विद्यालय व म्युन्सीपल हायस्कूलमध्ये शिक्षण सभापती व उपनगराध्यक्ष हे ध्वजारोहण करतात व ही परंपरा होल्या 50 वर्षापासून अखंडपणे सुरू होती.
पालिकेत सत्ताबदल झाल्यानंतर या वर्षी ही परंपरा मोडीत काढून नगराध्यक्ष गायत्री गौर-भंगाळे यांनी द.शि.विद्यालय व म्युनिसीपल हायस्कूलमध्ये स्वतः च्या हातून ध्वजारोहण करण्याचा आदेश काढला आहे. 26 जानेवारी देशाचा गणतंत्र दिवशी ही नगराध्यक्ष यांना राजकारण व कुरघोडी सुचलेली आहे हे निषेधार्थ आहे. मनाचा मोठेपणा न दाखवता स्वतःच्या हाताने ध्वजारोहण करण्याचा आदेश काढून छोट्या मनोवृत्तीचे दर्शन त्यांनी घडवले आहे. ‘झारीतल्या शुक्राचार्य’ असलेल्या व्यक्तीने अशी चुकिची प्रकृती वाढवली आहे. चुकिये मार्गदर्शन करून अश्या मनोवृत्तीचे आदेश काढायला लावलेले आहे. सभापतींना ध्वजारोहण करू देण्याच्या या आदेशाचा आम्ही निषेध करतो शिवाय आम्हाला देशाबद्दल अभिमान असल्याने आम्ही सर्व गटातील नगरसेवक ध्वजारोहण कार्यक्रमास हजर राहणार असल्याचे लोणारींनी कळवले आहे.
नगराध्यक्षांनी फेटाळले आरोप : विरोधकांना सर्वच बाबतीत दिसते राजकारण
नगराध्यक्षा गायत्री गौर-भंगाळे म्हणाल्या की, गणतंत्र दिन हा राष्ट्राचा अभिमानाचा सण आहे. या दिवशी कोणतेही राजकारण करण्याचा आपला हेतू नाही. ध्वजारोहणाबाबत घेतलेला निर्णय प्रशासनाच्या सल्ल्याने आणि कार्यक्रमातील सुसूत्रता लक्षात घेऊनच करण्यात आला आहे. कोणाच्याही अधिकारांवर गदा आणण्याचा उद्देश नाही. सर्व पदाधिकार्यांचा सन्मान राखत राष्ट्रीय सण एकात्मतेने साजरा व्हावा, हीच भूमिका आहे. गेल्या चार वर्षांपासून कुणीही सभापती नव्हता. कोणत्याही पदाधिकार्याला डावलण्याचा हेतू नाही तसे असते तर पाणीपुरवठा व आरोग्य सभापतींनाही ध्वजारोहणाचा मान दिला नसतो मात्र भुसावळातील विरोधकांना प्रत्येक गोष्टीत राजकारण दिसत असल्याचे भंगाळे म्हणाल्या. शिक्षण समितीचा प्रमुख मुख्य अध्यक्ष असतो, असेही त्या म्हणाल्या.

