यावल आगारातील चालक-वाहकांचा प्रामाणिकपणा : बसमध्ये सापडलेले पाकीट केले परत


The honesty of the driver and conductor of the Yaval depot: They returned a wallet found in the bus यावल (24 जानेवारी 2026) : यावल एस.टी.आगारातील वाहकास बसमध्ये सापडलेले पैसे व विविध कार्ड असलेले पाकीट त्यांनी प्रामाणिकपणे परत केले. यावल एस.टी.आगारात या बसमधील चालकासह वाहकास त्याच्या प्रामाणिकपणाबद्दल सन्मानीत करण्यात आले.

काय घडले बस प्रवासात ?
यावल एसटी आगारातील चालक रफिक तडवी व वाहक नबाब तडवी हे चोपडा मुक्कामाची बस घेवून नियोजित फेरी यावल ते पाल जात होते. या बसमध्ये प्रवासी सरफराज तडवी (अमळनेर) यांचे पैशाने भरलेले पॉकेट व त्यात एटीएम कार्ड, डेबिट कार्ड हे बसमध्ये पडले. व ते पाकीट वाहक नबाब तडवी यांना आगारात बस आल्यानंतर बसच्या पाहणीत मिळून आले. वाहक तडवी यांनी ते पाकीट चेक केले असता त्यात रुपये व एटीएम कार्ड, आधार कार्ड असे होते. आधार कार्ड वरील मोबाईल नंबर वर त्यांनी फोन केला असता सदर प्रवाशाचे पाकीट हे अमळनेर येथील तडवी यांचे असल्याचे त्यांना समजले. तडवी यांना फोन करून त्यांचे पाकीट त्यांच्या स्वाधीन केले व आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावले म्हणून त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

चालक-वाहकांचा सन्मान
दिलीप महाजन यांनी दोघांना सन्मानीत केले तसेच पॉकेट मिळाल्याबद्दल सरफराज तडवी यांच्याकडून अभिनंदन भेट म्हणून हजार रुपये बक्षीस चालक-वाहकांना देण्यात आले. कार्यशाळा प्रमुख शुक्ला, कुंदन वानखेडे व इंटक संघटना अध्यक्ष नामदार तडवी यांच्याहस्ते बक्षीस चालक वाहकांस देण्यात आले. यावेळी लिपिक महेंद्र पाटील, अतुल चौधरी, वाहन परीक्षक संजय चौधरी, वाय.सी.तडवी, आर.सी.सोनवणे, डी.एम.भोई, हेमंत पाटील, एस.आर.तडवी, राजू बारी, के.वी.साळुंखेसह रापम कर्मचारी उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !