सहर शेखच्या वक्तव्याचे एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी केले समर्थन


मुंबई (24 जानेवारी 2026) : मुंब्रा येथून राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड यांना थेट टक्कर देवून विजयी झालेल्या एमआयएम उमेदवार सहर शेख यांनी विजयानंतर संपूर्ण मुंब्रा हिरवा करायचाय, असे तिने आपल्या स्टाईलने म्हटले होते. तिच्या भाषणावर टीकेची झोड उठताच तिला नोटीसही बजावण्यात आली होती मात्र या वक्तव्याचे एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी समर्थन केले आहे.

काय म्हणाले इम्तियाज जलील ?
एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलीलयांनी सहर शेखच्या वक्तव्याचे समर्थन करीत तिच्या वक्तव्यावरुन आम्ही मागे हटणार नाही, असे म्हटले आहे. मी आभारी आहे त्यांनी आम्हाला भरभरून मतदान दिले आहे, मुंबईकरांचे देखील आभारी आहे, महाराष्ट्रात 125 जागांवर आम्हाला विजय मिळाला आहे. असदुद्दीन ओवैसींपेक्षा मोठा नेता कोणता आहे असे वाटत नाही. कारण संविधान वाचवायला ते सांगत आहेत. जेव्हापासून नरेंद्र मोदी यांचे सरकार आले, तेव्हापासून हिंदू राष्ट्र करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यामध्ये भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यात सहभागी आहे. कारण, सत्तेसाठी हे एकत्र आले आहेत.

एमआयएम हिरव्या रंगाची आहे, असे सगळे बोलत होते मात्र मुंबईत आमचे जे नगरसेवक निवडून आणले आहे, त्यांना आम्ही मुंबईची जबाबदारी देणार आहोत, असे इम्तियाज जलील यांनी म्हटले.

जनता आमच्यासोबत
अनेक शहरात आम्ही एससी, ओबीसी लोकांना निवडून आणले आहे. मुंब्रामध्ये जेव्हा हिरवा-भगवा करत होते तेव्हा मयूर सारंग यांनादेखील आम्ही तिकीट दिले होते, ते देखील निवडून यायला पाहिजे होते. आम्ही हिंदू लोकांना देखील तिकीट दिले आहे, जनता आमच्यासोबत आहे. ओवेसी यांनी परदेशात जाऊन लोकसभेत देखील कशी भूमिका मांडली होती पण ज्यांना भुंकायचे आहे, त्यांनी भुंकावे असेही जलील यांनी म्हटले. तसेच, माझ्या गाडीत भगवा, हिरवा सगळे रंग होते, तुम्ही देशाला रंगात वाटले आहे, कोणता रंग कोणत्या जातीसोबत हे तुम्ही जोडले आहे, रंगावरून त्यांची मानसिकता दिसून येते, असे म्हणत जलील यांनी भाजप नेते तथा मंत्री नितेश राणे यांचा एक व्हिडिओ दाखवला.

मग त्या आमदारांवर काय कारवाई केली?
अनेक आमदार मुसलमान विरोधात बोलतात, त्यांच्यावर काय कारवाई केली? एक तोत्रा येतो आणि तुम्ही इतका मोठा विवाद करता, त्यांनी आणले त्यापेक्षा जास्त माणसे मी आणू शकतो. तुमची सत्ता आहे तर कानून तुमच्यासारखे चालणार का? मी विचारतो की कोणत्या नियमाखाली पोलिसांनी या लहान मुलीला नोटीस पाठवली? तिने जे स्टेटमेंट दिले त्यावरून आम्ही मागे हटणार नाही, ती जे बोलली त्याला आम्ही सपोर्ट करतो, अशी भूमिका देखील इम्तियाज जलील यांनी मांडली तसेच फक्त मुंब्रा नाही संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही चांगल्या प्रकारे हिरवा रंग पसरवू, हे मी ठणकावून सांगतो, असेही ते म्हणाले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !