‘कैसा हराया’ म्हणणार्‍या सहर शेखचा अखेर माफिनामा !


Sahar Sheikh, who had said, “How did they defeat me?”, finally issues an apology! मुंबई (24 जानेवारी 2026) : ‘कैसा हराया’ म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना डिवचणार्‍या व चर्चेत आलेल्या सहर शेखने भाषणात संपूर्ण मुंब्रा हिरवे करण्याचीही घोषणा केली. त्याचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर अखेर सहर शेखने पोलिसांकडे आपला माफीनामा लिहून दिला आहे. या माफीनाम्यात सहर शेखने आपल्या विधानाचा विपर्यास करण्यात आल्याचा दावा केला.

काय घडले मुंबईत ?
नगरसेविका सहर शेख यांनी कैसा हराया, अभी हम लोगों को मुंब्रा को पुरा हरा कर देना हैं, असे विधान केले होते. या प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यासह आमदार निरंजन डावखरे, बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत सहर शेखने आपला माफीनामा लिहून देऊन या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केल. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणातील सर्वच तक्रारदारांना त्याची माहिती कळवली आहे.

सहर शेखने मागितली माफी
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या प्रकरणी मुंब्रा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांची भेट घेऊन प्रस्तुत प्रकरणाचा आढावा घेतला. त्यावेळी शिंदे यांनी सहर शेखच्या चौकशीचा अहवाल सादर केला. सहर शेखने आपल्या विधानाविषयी 23 जानेवारी रोजीच माफीनामा दिला आहे, असे त्यांनी सोमय्यांना सांगितले. मुंब्रा येथील सभेत वापरलेले वाक्य हे पक्षाचा झेंडा व निशाणीच्या संदर्भात होते. या प्रकरणी कुणाचेही मन दुखावण्याचा व सामाजिक वातावरण बिघडवण्याचा हेतू नव्हता. आम्ही तिरंग्यासाठी जगू व तिरंग्यासाठीच मरू त्यामु्ळे माझ्या विधानामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्यांची जाहीर व लेखी स्वरुपात माफी मागते, असे सहर शेखने आपल्या माफीनाम्यात म्हटले आहे. तिचा माफीनामा स्वीकारल्यानंतर पोलिसांनी हे प्रकरण दप्तरी नोंदवले आहे.

भविष्यात अशा प्रकारचे विधान झाल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल याची तजवीज या माध्यमातून पोलिसांनी केली आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !