!-- afp header code starts here -->

भुसावळातील पालिका शाळा क्रमांक 35 मध्ये डॉ.छाया फालक यांनी केले ध्वजारोहण


भुसावळ (26 जानेवारी 2026) : प्रजासत्ताक दिनानिमित्त नगरपालिकेच्या शाळा क्रमांक 35 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या नूतन नगरसेविका डॉ.छाया फालक-देशमुख यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना वृद्धिंगत व्हावी या उद्देशाने पेन व वह्यांचे मोफत वाटप करण्यात आले. डॉ.छाया फालक-देशमुख यांनी विद्यार्थ्यांना 26 जानेवारीचे महत्त्व सांगत शिक्षण हेच उज्ज्वल भविष्याची गुरुकिल्ली असल्याचे प्रतिपादन केले.

या कार्यक्रमास समाजसेवक रुपेश देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत नियमित शिक्षण व शिस्तीचे महत्त्व अधोरेखित केले. शाळेतील शिक्षकवृंद, कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण परिसरात देशभक्तीपर वातावरण निर्माण झाले.


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !