!-- afp header code starts here -->

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर भुसावळ जंक्शनवर ‘हाय अलर्ट’

रेल्वे आऊटरपर्यंत सशस्त्र गस्त सक्त : बंदोबस्तात मोठी वाढ


A ‘high alert’ has been issued at Bhusawal Junction in view of Republic Day भुसावळ (26 जानेवारी 2026) : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर, भुसावळ रेल्वे स्थानकावर सुरक्षेच्या दृष्टीने ‘हाय अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि कोणताही अनुचित प्रकार रोखण्यासाठी रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) व लोहमार्ग पोलिसांनी संयुक्तपणे बंदोबस्तात मोठी वाढ केली आहे. रेल्वे स्थानकाच्या मुख्य परिसरासह आऊटर सिग्नलपर्यंत जवानांची गस्त सक्त करण्यात आली आहे. श्वान पथकाद्वारे विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली. रेल्वे स्थानकासह परिसर, मुसाफिर खाना, प्रतिक्षालयासह सर्व प्लॅटफॉर्म, पादचारी पूल येथे श्वान पथकाकडून तपासणी केली जात आहे.

सर्वत्र सतर्कतेचे आदेश
प्रजासत्ताक दिनाचे गांभीर्य लक्षात घेता, तिकीट खिडकी परिसर, मुसाफिर खाना, सर्व प्लॅटफॉर्म, प्रतिक्षालय आणि पार्किंग झोनमध्ये श्वान पथकाच्या साहाय्याने तपासणी करण्यात येत आहे. प्रवाशांच्या बॅगा आणि पार्सल विभागातील साहित्याची ‘लगेज स्कॅनर’द्वारे तपासणी करण्यात आली.स्थानकाच्या दोन्ही प्रवेशद्वारांवर पोलीस तैनात आहे.

येणार्‍या-जाणार्‍या प्रत्येक संशयीत हालचालीवर बारीक लक्ष ठेवले जात आहे. आऊटरला आरपीएफची सक्त गस्त केली आहे.स्थानकाच्या मुख्य इमारतीसोबतच रेल्वेच्या आऊटर परिसरातही सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे.अनेकदा रेल्वे स्थानकाच्या बाहेरील भागात संशयीत हालचाली होण्याची शक्यता असते, ही बाब ओळखून आरपीएफ जवानांची आऊटर गस्त सक्त करण्यात आली आहे. रुळांच्या कडेने आणि यार्ड परिसरात सशस्त्र जवान तैनात करण्यात आले आहेत.

सीसीटीव्ही कंट्रोल रूम ‘अ‍ॅक्टिव्ह मोड’वर
रेल्वे स्थानकावरील प्रत्येक कोपर्‍यावर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कंट्रोल रूममधील चमू अहोरात्र कार्यरत आहे. संशयास्पद हालचाली करणार्‍या व्यक्तींवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून ‘थर्ड आय’ वॉच ठेवला जात असून, नियंत्रण कक्षाकडून वेळोवेळी मैदानी कर्मचार्‍यांना सूचना दिल्या जात आहेत.


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !