!-- afp header code starts here -->

भुसावळ पालिकेची 3 रोजी पहिलीच सर्वसाधारण सभा : भाजप नगरसेवकांच्या प्रभागातील विषयांवर फुली

आधी भाजपा व आता सत्ताधारी राष्ट्रवादीने गिरवला तोच कित्ता : प्रभाग दोनमधील सर्वाधिक विषय अजेंड्यावर


Bhusawal Municipality’s first general meeting on the 3rd: Issues from BJP corporators’ wards excluded from the agenda भुसावळ (27 जानेवारी 2026) : नगरपालिकेत सत्तांतरणानंतर पालिकेची पहिली सर्वसाधारण सभा 3 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता नगरपालिका सभागृहात होत आहे. सभेसमोर तब्बल 249 विषय अजेंड्यावर घेण्यात आले आहेत. विशेष म्हणजे सत्ताधारी राष्ट्रवादीने विरोधक भाजपच्या नगरसेवकांच्या प्रभागातील एकही विषय अजेंड्यावर घेतला नाही तर दुसरीकडे अपक्ष, राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना, काँग्रेसच्या नगरसेवक असलेल्या तब्बल 14 प्रभागातील विकासात्मक कामांचे विषय आहेत.

ज्या प्रभागात भाजपचे नगरसेवक निवडून आले आहेत, अशा 11 प्रभागांमधील एकही नगरसेवकांचे विकासात्मक विषय अजेंड्यावर नाही, यामुळे शहरातील राजकिय कुरघेाड्या वाढल्या आहेत. दरम्यान, यापूर्वी सत्तेत असलेल्या भाजपानेही त्यावेळी विरोधी असलेल्या राष्ट्रवादी नगरसेवकांच्या वॉर्डातील एकही विषय न घेतल्याने तोच कित्ता आत्ताच्या सत्ताधार्‍यांनी गिरवला आहे.

प्रभाग दोनमध्ये सर्वाधिक 42 विषय
पालिकेच्या आगामी सभेच्या अजेंड्यावर 249 विषय आहेत. यात सर्वाधिक 42 विषय हे एकट्या प्रभाग क्रमांक दोनमधील आहेत. प्रभाग क्रमांक तीनमध्ये 19 विषय आहेत. यासोबतच प्रभाग 2, 3, 8, 11 ते20 व 22 या प्रभागातील विकासात्मक कामांचे विषय अजेंड्यावर घेण्यात आले आहेत. भाजपचे नगरसेवक असलेल्या प्रभाग 1, 4,5 ते 7, 9, 10, 21, 23 ते 25 या प्रभागातील एकही विषय अजेंड्यावर नाही.

असे आहेत विषय
डॉ.बाबासाहेब आंबेडकर संकूलातील न्यायालयाच्या आदेशान्वये 60 गाळे आरक्षीत ठेवून उर्वरित गाळ्यांचे ई ऑक्शन करणे, स्मशानभूमीत लाकडांचा पुरवठा करणे, तापी बंधार्‍याची कार्यात्तर मंजूरी घेवून डागडूजी करणे,कमी दाबाने पुरवठा होणार्‍या भागांसाठी बुस्टर पंप बसवणे, उन्हाळ्यात पाणबुडीव्दारे पाणी उचल करुन जॅकवेलपर्यंत पाणी पोचवणे, शहरातील अधिक रहदारी असलेल्या मार्गावर गतीरोधक बसवणे आदींसह अनेक विकासात्मक विषय घेण्यात आले आहेत.


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !