!-- afp header code starts here -->

श्री स्वामिनारायण गुरुकुलमध्ये 77 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात


भुसावळ (27 जानेवारी 2026) : भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथील श्री स्वामिनारायण गुरुकुल विद्यालयात 26 जानेवारी रोजी देशाचा 77 वा प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साह पूर्ण व देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात देशाचे संविधान वाचन करून ध्वजारोहणाने झाली. याप्रसंगी प्रमुख अतिथी धीरज कुरकुरे यांच्याहस्ते ध्वजारोहण झाले. पी.एस.लोखंर्डेें शशिकांत कोल्हे, जे.के.भिरूड, संचालक गोपाळ भगत, लता भिरुड आदी उपस्थित होते. प्राथमिक मुख्याध्यापक मनोज भोसले, अभिष सरोदे, मुख्याध्यापिका प्रणिता चौधरी, उज्वला धांडे उपस्थित होत्या.

कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. काही विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. काही विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध व आकर्षक मानवी पिरॅमिड (मनोरा) सादर करून देशप्रेम, एकता व शौर्याचा संदेश दिला.या सादरीकरणाला उपस्थितांकडून उस्फूर्त टाळ्यांची दाद मिळाली. याप्रसंगी प्रमुख पाहुणे धीरज कुरकुरे यांनी मार्गदर्शनपर भाषणात भारतीय संविधानाचे महत्त्व व नागरिकांची कर्तव्य व जबाबदार्‍या तसेच राष्ट्रप्रेमाची भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याचे महत्व विशद केले. संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध, उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात पार पडला.


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !