चिंचोलीत आगीत घर जळाले : संसार उघड्यावर
A house was gutted in a fire in Chincholi: the family is left homeless यावल (28 जानेवारी 2026) : यावल तालुक्यातील चिंचोली येथे घराला लागून ठेवलेल्या सरपणाला लागलेल्या आगीत घर जळाले. या आगाीत घरातील टीव्हीसह संसारोपयोगी साहित्य जळून सुमारे 50 हजाराचे नुकसान झाले.
काय घडले चिंचोलीत ?
चिंचोली येथील भवानी पेठमधील रहिवासी प्रदीप रामकृष्ण पाटील हे आपल्या परीवारासह वास्तव्यास आहेत. भवानी मंदिराच्या समोरच त्यांचे एक कुळाने बांधलेले घर आहे. या घराला लागुन धनराज धनगर यांचे सरपण ठेवले होते. त्यास शनिवारी रात्री आग लागली. या आगीमुळे प्रदीप पाटील यांचे घर जळाले आग लागली. त्यावेळी प्रदीप पाटील हे आपल्या दुसर्या घरात झोपले होते त्यामुळे आग लागलेल्या घरात कोणीही नव्हते. आगीत घरातील टीव्ही, धान्य दळण्याची लहान चक्की, गोदरेज कपाट, त्यातील कपडे, साडी, घरातील पंखा, व इतर संसारोपयोगी वस्तू जळाल्याने सुमारे 50 हजारांचे नुकसान झाले आहे.

मध्यरात्री लागली आग
रात्री दोन वाजेच्या सुमारास त्यांच्या घराला आग लागली असल्याची माहिती शेजारींनी त्यांना दिली. यावेळी शेजार्यांनी मदत करून आग विझवण्यासाठी प्रयत्न केले परंतु तोपर्यंत बर्याच संसारोपयोगी वस्तू जळाल्याने मोठे नुकसान झाले. आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र कळू शकले नाही.







