प्रवाशांना दिलासा : साईनगर शिर्डी-बिकानेर विशेष रेल्वेसेवेला मुदतवाढ
भुसावळ (29 जानेवारी 2026) : प्रवाशांची वाढती संख्या तसेच त्यांच्या सोयीसुविधांचा विचार करून रेल्वे प्रशासनाने साईनगर शिर्डी – बीकानेर साप्ताहिक विशेष रेल्वेसेवेच्या संचालन कालावधीत वाढ केली आहे.
गाडी क्रमांक 04716 साईनगर शिर्डी – बीकानेर साप्ताहिक विशेष रेल्वे ही पूर्वी अधिसूचित 1 फेब्रुवारीपर्यंत चालविण्यासाठी अधिसूचित करण्यात आली मात्र आता ती 1 मार्चपर्यंत वाढविण्यात आली आहे.
गाडी क्रमांक 04715 बिकानेर-साईनगर शिर्डी साप्ताहिक विशेष रेल्वे ही पूर्वी अधिसूचित 31 जानेवारीपर्यंत धावणार होती मात्र ती आता 28 फेब्रुवारीपर्यंत धावेल.
या गाडीला मनमाड, भुसावळ, खंडवा, हरदा, इटारसी, भोपाळ, उज्जैन, नागदा, शामगढ, रामगंज मंडी, कोटा, सवाई माधोपूर, दुर्गापुरा, जयपूर, ढेहर का बालाजी, रिंगस, सीकर, लक्ष्मणगढ, फतेहपूर शेखावाटी, चूरू, रतनगढ, राजलदेसर आणि श्री डूंगरगढ स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.
वरील विशेष रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात, थांब्यांमध्ये व डब्यांच्या संरचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
