भुसावळातील प.क.कोटेचा महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी लावले खाद्य पदार्थांचे स्टॉल


भुसावळ (29 जानेवारी 2026) : शहरातील श्रीमती प.क.कोटेचा महिला महाविद्यालयाच्या वाणिज्य विभाग आणि महिला उद्योजकता कोर्सच्या विद्यार्थिनींनी प्रदर्शन व विक्री कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये विद्यार्थिनींनी विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले होते. याचा सर्व विद्यार्थ्यांनी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी आस्वाद घेतला.

कार्यक्रमाच्या ठिकाणी विद्यार्थिनींनी चायनीज नूडल्स, चना चाट, कॅनापीस, पाणीपुरी, भेळ, साबुदाणा वडा, इडली, मफिन्स,पाव
वडा, कॉफी अशा विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले होते.

उद्घाटन महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.जीवन धांडे यांनी केले. या प्रसंगी नाहाटा महाविद्यालयाचे अर्थशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. किरण वारके उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजक वाणिज्य विभाग प्रमुख डॉ.राजकुवर गजरे, प्रा.पंकज फालक, प्रा.रविकांत वासनिक, प्रा.भाग्यवती, प्रा.दीपाली पाटील, प्रा.निलेश गुरचळ, प्रा.गिरीश कोळी, प्रा.गिरीश सरोदे, प्रा.विनोद भालेराव, प्रा.खेट्टे हजर होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !