पुरग्रस्तांसाठी श्री गजानन महाराज संस्थानकडून एक कोटी 11 लाखांची मदत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मदतीचा धनादेश सुपूर्द
शेगाव : श्री गजानन महाराज संस्थानकडून एक कोटी 11 लाखांची मदत पूरग्रस्तांसाठी देण्यात आले. महाजनादेश यात्रेनिमित्त श्री क्षेत्र शेगावात आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. श्रींच्या मंदिरात मुख्यमंत्र्यांनी समाधीचे दर्शन घेतल्यानंतर श्री गजानन महाराज संस्थानचे कार्यकारी विश्वस्त नीळकंठ पाटील यांनी मुख्यमंत्र्यांसह अन्य अतिथींचे शाल व श्रीफळ देवून स्वागत केले.
यांची होती उपस्थिती
प्रसंगी जलसंपदा मंत्री गिरीष महाजनख, केंद्रीय मंत्री संजय धोत्रे, डॉ.संजय कुटे, डॉ.रणजित पाटील, विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष चैनसुख संचेती, आमदार सुमित ठाकूर, आमदार आकाश फुंडकर, जि.प.अध्यक्ष तायडे, भाजप जिल्हाध्यक्ष ध्रुपदराव सावळे, जि.प.महिला व बालकल्याण सभापती श्वेता महाले पाटील, जिल्हा सरचिटणीस संतोष देशमुख, नंदू अग्रवाल यांच्यासह अन्य स्थानिक भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.