चोपडा शहरातील हवालदार निलंबित : समोर आले ‘हे’ कारण


The constable in Chopda city has been suspended : ‘This’ reason has come to light जळगाव (2 फेब्रुवारी 2026) : वाहनधारकांकडून पैसे उकळत असल्याच्या तक्रारीनंतर चोपडा शहरातील पोलीस हवालदाराला निलंबित करण्यात आले आहे. लक्ष्मण त्र्यंबक शिंगाणे असं निलंबित केलेल्या हवालदाराने नाव आहे. या कारवाईने पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

पैसे उकळल्याची चर्चा
चोपडा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोलिस चौकीजवळ वाहतूक हवालदार म्हणून लक्ष्मण शिंगाणे हे कार्यरत होते. मागील आठवड्यात शिरपूर तालुक्यातील नागेश्वर बगला या गावातील तरुणाकडून गांजाच्या कारवाईसाठी तीन ते चार पोलिसांनी पैसे उकळल्याची चर्चा होती.

याबाबत करण्यात आलेल्या तक्रारींची दखल घेऊन जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी ही कारवाई केली, अशी माहिती चोपडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक मधुकर साळवे यांनी दिली.

 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !