भुसावळात शिवजयंतीनिमित्त पांडुरंगनाथ नगरात विविध कार्यक्रम
भुसावळ (13 फेब्रुवारी 2026) : शहरातील पांडुरंगनाथ नगर पूजा कॉम्प्लेक्स व मातोश्री चौक परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या 396 व्या जयंतीनिमित्त 18 व 19 फेब्रुवारी 2026 या कालावधीत विविध सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
18 रोजी वक्तृत्व स्पर्धा
जयंती उत्सवाची सुरुवात 18 फेब्रुवारीपासून परिसरातील विद्यार्थ्यांसाठी वकृत्व स्पर्धेचे आयोजन करून करण्यात आली आहे.

पहिला गट वर्ग 05 ते 07 दुसरा गट वर्ग 08 ते 10 तिसरा गट वर्ग 11 ते पुढे या तिघही गटातून प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाचे विजेते घोषित करण्यात आल्यानंतर त्यांना 19 फेब्रुवारीच्या कार्यक्रमात मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित केले जाईल.
19 रोजी भव्य मिरवणूक
19 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी चार वाजेला वंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांची संपूर्ण परिसरात मिरवणूक काढली जाईल व ठीक संध्याकाळी सात वाजता प्रसिद्ध विचारवंत आणि चळवळीचे अभ्यासक प्रा.डॉ.जयंत लेकुरवाळे यांचे छत्रपती शिवरायांचे जीवन कार्यावर प्रबोधनात्मक व्याख्यान होईल.
19 फेब्रुवारीलाच सांस्कृतिक कार्यक्रमात मराठी लोक नृत्य संगीत आणि नाटक तसेच शिवाजी महाराजांच्या आदर्श विचारांवर आधारित नागरिकांकडून प्रतिज्ञा ग्रहण केली जाईल.






