!-- afp header code starts here -->

जळगाव जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे 16 फेब्रुवारीला आयोजन


Jalgaon District Level Women’s Democracy Day organized on February 16 जळगव (13 फेब्रुवारी 2026) : जळगाव जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन येत्या 16 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी यांच्या दालनात सकाळी 11 वाजता होत आहे. याबाबची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रफिक हुरमत रुबाब तडवी यांनी दिली आहे.

दर महिन्याच्या तिसर्‍या सोमवारी लोकशाही दिन
समस्याग्रस्त व पीडीत महिलांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे. तसेच त्यांच्या हक्काचे संरक्षण होवून त्यांना न्याय मिळावा. या दृष्टीने महिलांच्या तक्रारी, अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी व समाजातील पिडीत महिलांना मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी. यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून महिला लोकशाही दिन जिल्हा स्तरावर दर महिन्याच्या तिसर्‍या सोमवारी राबविण्यात येतो.


16 फेब्रुवारी रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व गरजू महिलांनी वेळेत जिल्हाधिकारी यांच्या दालनात उपथिस्ती द्यावी, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !