!-- afp header code starts here -->

भुसावळात 27 वर्षीय विवाहितेचा विनयभंग


27-year-old married woman molested in Bhusawal भुसावळ (13 फेब्रुवारी 2026) :  शहरातील 27 वर्षीय महिलेचा विनयभंग करीत महिलेशी गैरवर्तन करण्यात आले. यााप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुरुवार, 12 फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.

घरात कुणी नसल्याची साधली संधी
भुसावळ शहरातील एका भागात 27 वर्षीय पीडित महिला आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहे. गुरुवार, 12 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास महिला आपल्या घरात असताना संशयित आरोपी धनराज कनैय्यालाल कुकरेजा हा अचानक घरात शिरला. घरात कोणी नसल्याची संधी साधून त्याने महिलेशी अश्लील संवाद साधत गैरवर्तन केले व पीडित महिलेचा हात पकडून तिला धक्काबुक्की करत तिचा विनयभंग केला.


पीडीतेने बाजारपेठ पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून गुरुवारी रात्री 11 वाजता संशयित आरोपी धनराज कनैय्यालाल कुकरेजा याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश चौधरी करीत आहेत.


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !