!-- afp header code starts here -->

भुसावळात गॅस कटरने कपाट फोडत 95 हजाराचे दागिने लांबवले

मटन मार्केट पाठीमागील भागातील बंद घरात धाडसी घरफोडीने शहात खळबळ


भुसावळ (14 फेब्रुवारी 2026)  भुसावळ शहरातील मटन मार्केट पाठीमागील परिसरात धाडसी घरफोडी झाल्याने शहरात खळबळ उडाली. चोरट्यांनी गॅस कटरच्या साह्याने कपाट फोडून रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिन्यांसह 95 हजारांचा ऐवज लंपास केला

काय आहे नेमके प्रकरण ?
भुसावळातील रहिवासी जमीला रऊफ कुरेशी या 6 फेब्रुवारी 2026 रोजी आईची प्रकृती बिघडल्याने बडनेरा येथे गेल्या होत्या. आईची प्रकृती गंभीर असल्याने त्या तेथेच थांबल्या घर बंद होते व गुरुवार, 12 रोजी त्यांनी मुलगी व जावयास घराची पाहणी करण्यास सांगितले असता घरात प्रवेश करताच दोन्ही खोल्यांचे कडी-कोंडे तुटलेल्या अवस्थेत आढळले. एका खोलीतील पेटी फोडलेली होती तर दुसर्‍या खोलीतील कपाटांचे लॉक तोडले होते. विशेष म्हणजे एका कपाटाचे लॉक गॅस कटरने कापण्यात आल्याचे स्पष्ट दिसून आले. घरातील पलंग, बॅगा, पिशव्या व तिजोरीत अस्ताव्यस्त शोधाशोध करण्यात आल्याचेही निदर्शनास आले. या घरफोडीत सुमारे 95 हजार रुपयांची रोख रक्कम चोरीस गेली असून एका गल्ल्यातील रक्कम नेमकी किती होती, हे स्पष्ट झालेले नाही तसेच पाऊण ते एक किलो चांदीचे दागिने, फुलजोडी, चैन, पट्ट्या, जोडवे, पायातील बेडी, अंगठ्या तसेच तीन ते चार तोळे सोन्याचे दागिने पान, आयरिंग, गळ्यातील चैन, चावलपोत, सातपत्ती मंगळसूत्र व मुख्य मंगळसूत्र (मणी-पत्यांसह) असा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.


संशय अधिक गडद
कपाटालगतचा बाहेरील दरवाजा आतून कडी लावलेला असताना ती बाहेरून लावलेली आढळून आल्याने संशय अधिक गडद झाला आहे.आम्ही दाराला आतूनच कडी लावतो,बाहेरून कधीच लावत नाही,अशी माहिती जमीला कुरेशी यांनी दिली.

बाजारपेठ पोलिसांची धाव
घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक पाहणीनंतर शुक्रवारी पंचनामा केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. घराच्या बाजूला नाला असल्याने चोरट्यांनी नाल्याच्या बाजूने येत घरफोडी केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त आहे. घर तब्बल आठ दिवस बंद असल्याने चोरी नेमकी कोणत्या दिवशी झाली, याचा तपास पोलीस करत आहेत. भरवस्तीत एवढ्या मोठ्या प्रमाणावर घरफोडी झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सीसीटीव्ही फुटेजची पाहणी पोलिसांकडून केली जात आहे.


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !